धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) चांगला माणूस घडावं, यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणून शिक्षणाकडे डोळसपणे पाहायला हवं. माणूस उभा करनं हा शिक्षणाचा हेतू आहे. अज्ञान समजून घेणे हेच अध्ययन होय. असे उदगार प्रा डॉ रुद्देवाड यांनी काढले.
ते येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 05 सप्टेंबर 24 रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची उपस्थिती होती. भौतिकशास्त्र विभाग आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढं बोलताना ते म्हणाले की चांगला शिक्षक होणं हा एक मोठा बहुमान आहे. आजचा दिवस हा शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस आहे.
दरम्यान या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक विभाग अहवाल शैक्षणिक वर्ष 2023 – 24 प्रकाशित करण्यात आला. 38 कार्यक्रमांचे संकलन करून हा 60 पानांचा अहवाल सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा जंगिटवार व्ही आर आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी तयार केला आहे.
प्रा डॉ रुद्देवाड यांनी आपले स्वलिखीत आणि अप्रकाशित 11 ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट म्हणून ग्रंथपाल प्रा दराडे जी एस यांच्या सुपुर्द केले. कार्यक्रमाची सांगता साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या वंदनेने झाली.प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा मुंडे एस जी यांनी केले तर सुत्रसंचलन प्रतिक्षा चाटे यांनी केले. आभार प्रा डॉ चाटे टी व्ही यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बळिराम पेंटुळे यांनी परिश्रम घेतले.