*ॲड.उमर शेख*
रुढी-परंपरा पाळत नात्यातील गोडवा जपण्याची परंपराही पाळल्यास जीवनाचा आनंद वाढत जातो. अशीच परंपरा येथील येईलवाड परिवाराने जोपासली आहे. ज्येष्ठ गौरी पूजन सणाच्या काळात आपल्या सुनांचे गौरीपूजन केले जाते. सासू-सुनेचे प्रेमळ नाते सलग ४ वर्ष जोपासत एक आदर्श जनमानसात या परिवाराने ठेवला आहे.
शहरातील येईलवाड कुटूंबात सासु- सूना या लक्ष्मीच्या पावलाप्रमाणे एकरूप झाल्या आहेत. कंधारमधील येईलवाड परिवाराने तिन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरामध्ये पारंपरिक पद्धतीने बसवत त्यांचे पूजन केले. सलग चौथ्या वर्षी अशा वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करीत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. येईलवाड कुटूंबाचे हे चौथे वर्ष आहे. गेल्यावर्षी तिसरी सून घरात आली म्हणून तिन्ही सुनांचे उत्साहात चालत्या-बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सूनच असते, असा संदेश समाजासमोर दिला आहे. आमचे सासु-सासरे हे आई-बाबा आहेत. त्यांनी आम्हाला खूप आदर दिला आहे. आम्हीही त्यांचा तितकाच आदर देतो, असे गौरी झालेल्या तिन्ही सुनांनी सांगितले.
मुलीला मान सन्मान मिळायला पाहिले तसा सन्मान आपल्या समाजामध्ये मुलीला भेटत नाही. सुनेला जसा आदर्श भेटायला पाहिजे तसा भेटत नाही त्यानिमित्त रामचंद्र येईलवाड यांनी एक वेगळा व अनोखा कार्यक्रम लक्ष्मीपूजन च्या दिवशी घेतला.
आपल्या सुनेला लक्ष्मी मानावे हजारो वर्षांपासून आपण घरी लक्ष्मी बसवतो आपण लाकडी लक्ष्मी व चिखलाचा मुखवटा बसवतो व त्याला रंगीबेरंगी कपडे नेसवतो. हजारो रुपये खर्च करतो खरेच ही लक्ष्मी आहे का? असा सवाल येईलवाड यांनी केला.
सुना या आपल्या घरच्या लक्ष्मी असते. ही लक्ष्मी आपला वंश वाढवतो त्याच्या भविष्यातील पुढील पिढी घडते. आणि आपल्या लेकीमुळे, बहिणीमुळे, ज्या घरी आपण कन्यादान करतो ती त्याघरची लक्ष्मी आहे. कुटुंब पध्दती नष्ट होत आहे. ज्या महिलांचा लक्ष्मी पूजन मानसन्मान केला जातो तिथे लक्ष्मीची पाऊले पडायला सुरुवात होते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ फक्त नावाप्रमाणेच आहे आज महिलांवर अत्याचार होत आहेत हे सर्व परिवर्तन केले पाहिजे. चालती बोलती लक्ष्मी हीच खरी लक्ष्मी आहे. तुमची लक्ष्मी तुमची सून, माय, बहीण आहे असा संदेश त्यांनी दिला. समाजातील सर्व कुटुंबाने जर महिलांना सन्मान देऊ केला. त्यांना शिकण्याची संधी दिली, मुलीना सक्षम बनवले, मुलींना सामर्थ्य दिले तर कुठल्याच देवतेची पूजा करायची वेळ लागत नाही.
*माझ्या सुना चालती- बोलती लक्ष्मी*
माझ्या तिन्ही सुना या सुना नसून मुली आहेत. त्या खऱ्या अर्थाने चालत्या-बोलत्या लक्ष्मी आहेत. आम्ही सुनेला मुलगी मानून लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. मुलीला जसे प्रेम दिले, तसेच सुनेलाही दिले तर सूनही मुलगी होवू शकते. गौरी सोहळ्यामधून प्रेम, सलोखा आणि जिव्हाळा कायम रहावा, असाच आमचा उद्देश आहे.–
*सासू कमलबाई येईलवाड
आज मानव विज्ञानाकडे जात नसून अज्ञानाकडे जात आहे. मानवाला वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होऊन सुद्धा आज लाकडाला लक्ष्मी म्हणून पूजा करतात आणि हजारो रुपयाची उडाढाल करतात. आणि घरच्या स्त्रिया उपाशी ठेऊन राबराब घरात राबवतात. जर घरातील महिलांचा मान सन्मान केला तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन होईल. आज संस्कृतीच्या नावाखाली विकृती वाढत चालली आहे कोणत्याही सुनेला तिची आई प्रेमी आहे पण सासू नाही आज दृष्टिकोन बदलला पाहिजेत. —
*सासरा रामचंद्र येईलवाड ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष )*