मशाल एक संघर्षाची :-माझे अण्णा डॉ. भगवान वाघमारे

 

अठरा विश्व दारिद्र्यात जन्मला एक हिरा.
अनेकांच्या आयुष्यातील प्रेरणादायी चेहरा ….

जन्मापासूनच दुःख-यातना,

कष्टानेच बांधलेली शिदोरी…..
चहू बाजूने डोंगर
मधून छोटीशी नदी
त्याचं गावात जन्म झाला
नाव गावाचे गोगदरी….

त्या काळात जाती-भेदाचे
होते खूप थैमान.

निर्माणकर्त्याने पाठवले परिवारात आमच्या
एक स्वाभिमानाचे धान.

जन्मला कर्मयोगी वाघमारे कुळाला
नाव त्यांचे भगवान…..

जिद्द, चिकाटी, प्रानमाणिकपणा माणसं कमवण्याची घेतली ज्यांनी हमी.
अनेक गरजवंताच्या
येतात नेहमीच ते कामी.
अथांग परिश्रमातून
ज्यांनी गाठला शिक्षणाचा डोंगर केली कडे कपारी पार.

कुटुंबासह रुजविला
सामाजिक बांधीलकी
नि शैक्षणिक वावर.

स्वतःच्या घासातला घास.
समाजाचं देणं लागतं या
विचारांरचा जागता
भगवान नावाची अर्थपूर्ण रास

सामाजिक- शैक्षणिक सांस्कृतिक विचाराचा सक्षम साठा
शोषन-मुक्तीच्या प्रक्रियेतील अविभाज्य वाटा
भगवान या शब्दाचा
नक्कीच अर्थ काय आहे.
तथागताला जोडणाऱ्या नात्याचे जोते आहे

भगवान हे माझे
अण्णा माझा भगवान
सर्वांचे लाडके तारणवीर
म्हणजेच डॉ. भगवानराव वाघमारे हे जित-जागत उदाहरण
भ -: म्हणजे भगवान, पालनकर्ता
ग -: म्हणजे गरिबीशी संघर्षात्मक घेतलेली झुंज
वा-: म्हणजे विचार- वाणी -अभिव्यक्ती आणि ज्ञानाची सांगड.
न – : नवनिर्मितीचा धनी स्वकृतत्वाने, मेहनत-कष्टाची जिद्द जागतो मनी
दिशा देणारे कर्मयोगी
अर्थात भगवान….

मनाला वैचारिक विचाराची सवय लागली की
विवेकी कृती आपो-आप घडते म्हणणारे अण्णा.

कष्ट करा, मेहनत करा,
जोपर्यंत कष्टाची किंमत कळणार नाही
तोपर्यंत तो इतरांना
काहीच देऊ शकत नाही
नि काही सांगू शकत नाही
असे म्हणणारे माझे आण्णा . म्हणजेच भगवानराव वाघमारे सर.
त्यांनीच लढायला शिकवलं.
स्वाभिमानाने जगणे सांगितलं शिकवला स्वाभिमान
आणि प्रामाणिकपणा
काय असतं हे त्यांच्याकडूनच शिकायला मिळते.
सहजासहजी मिळालेली भाकर ही पचायला जड जाते
अन् , कष्टने कमावलेली भाकर ही सहजतेने पचते .
जडण-घडणीचे वृत्त अण्णांनी घेतले होते
घडवणीत आमच्या
ते दिवस रात्र व्यस्त होते.

बुद्ध — शिव -लहू- फुले- शाहू- आंबेडकरांना-अण्णा भाऊ यांच्या विचारांचे वारसदार आम्हाला त्यांनी घडवलं
तो वसा आणि वारसा
आम्ही नेहमीच पुढे नेवू
ही माझी शब्दफुले वाढदिवसानिमित्त अण्णाच्या चरणी वाहू
मी करतो याचना
आपणास उदंड आयुष्य लाभो
सुख — समृद्धी -आरोग्य मिळो अशी निसर्गाचरणी करतो प्रार्थना
आणि अजून आपल्याकडंचं जे-जे देता येईल तेवढं समाजासाठी, कुटुंबासाठी
देतच राहावे
मार्गदर्शन करता येईल तेवढ
करतच राहवे
अजून भरभरून देतच राहावे…..
क्रांतिकारी सल्यूट…

गजानन भिवजी वाघमारे
गोगदरिकर.. रा. सध्या
चाकण पुणे. महाराष्ट्र
9503871528..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *