कंधार ; प्रतिनिधी
मराठा योध्दा आदरनिय मनोजदादा जंरागे पाटील मागिल ४ दिवसापासुन अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन हाळदा ता. कंधार जि. नांदेड येथे दि. २१/०९/२०२४ रोजी सांयकाळी ५ वाजेपासुन अमरण उपोषणास सुरुवात येथिल तरूण शहाजी बाबाराव शिंदे यांनी केली असून कंधार तहसिलदार यांना निवेदनही दिले .
या निवेदनात पुढे असे नमूद केले की मनोजदादा जंरागे पाटील जो पर्यत अमरण उपोषण सोडत नाहीत. तो पर्यंत व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यत हाळदा ता. कंधार जि. नांदेड आमचे अमरण उपोषण चालु राहील.
आमच्या भावना शासन दरबारी मांडाव्यात आमच्या अमरण उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती कंधार तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली असून आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात हाळदा येथिल मराठा समाज बांधव प्रतिसाद देत आहेत .