कंधार ; प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुक मीच लढणार असे वक्तव्य शे.का.प.कार्यालय कंधार येथे माजी आमदार गुरूनाथराव कुरूडे यांच्या पक्ष कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता बोलताना आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाई मा.आ.गुरूनाथराव कुरूडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.ते पुढे म्हणाले, गेली पाच वर्ष मी अनेक विकासकामे केली आहेत हे जनतेला व तुम्हाला माहिती आहेत.शासन दरबारी त्याची नोंद आहे.
मतदारसंघात रस्ते शेतकऱ्यांचे प्रश्न ,सिंचनाचे प्रश्न , विद्युत प्रश्न गेले पाच वर्षे मी व माझे कुटुंब सतत सोडत आहे. मतदार संघात आता यापुढे माझी पत्नी सामाजिक कार्यकर्ता आशा शिंदे ह्या निवडणूक लढवणार अशा चर्चा केल्या जात आहे परंतु तसे नाही माझी पत्नी नाही तर,मीच पुन्हा लोहा विधानसभा लढणार आहे अशा प्रतिक्रिया यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली .
यावेळी शे.का.प कार्यालयात भाई बळीराम पाटील पेठकर,प्रा.वैजनाथराव कुरूडे ,भाई नागनाथ ठाकरे हे उपस्थित होते.
———-