सहकार्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, विधानसभा निवडणूक लढणारच! – चंद्रसेन पाटील सुरनर गौंडगावकर

 

कंधार ( प्रतिनिधी)

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, उमेदवारी मिळाली नसली तरीही मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नाराज नाही, ते कायम आदरस्थानी आहेत, मात्र मागील अनेक दिवसांपासून माझे सहकारी विधानसभा निवडणुकीसाठी रात्रंदिवस झटत आहेत, त्यांना वार्यावर सोडणार नाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक सहकार्यांचे फोन आले यामुळे लोहा विधानसभा निवडणूक मी पुर्ण ताकतीने लढणार आहे असे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

वंचीत बहुजन आघाडीची उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मला मतदारसंघातून माझ्या सहकार्यांचे मोठ्या प्रमाणात फोन आले, माझ्यावर प्रेम करणार्या सर्व सहकार्यांना निरोप देऊ इच्छीतो की मी विधानसभा निवडणुक २०२४ साठी उमेदवार असणारच आहे, कुठल्याही परिस्थितीत मी निवडणूक लढवणारच आहे, याबाबत शंका नसावी, याबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी लवकरच कार्यकर्ता मेळावा घेऊन दिशा ठरवली जाणार आहे . विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी भेटीसाठी लवकरच नियोजन करण्यात येईल. जनमताचा आदर करुन सहकार्यांच्या आग्रहास्तव आपण निवडणूक रिंगणात असणार असल्याचे आज दि .२२ रोजी कंधार येथे चंद्रसेन पाटील सुरनर गौंडगावकर यांनी सांगितले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *