केंद्र सरकारच्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने नांदेड जिल्हयातील बारूळ येथे “स्वच्छता हि सेवा” आणि “राष्ट्रीय पोषण अभियान” विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन

 

 

( कंधार ; प्रतिनिधी  ) 21/09/2024

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो व महिला व बालकल्याण विभाग जि. प. नांदेडच्या वतीने कंधार तालुक्यातील बारूळ येथे दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2024 रोजी स्वच्छता हि सेवा आणि राष्ट्रीय पोषण अभियानावर आधारित विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरात दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2024 दरम्यान स्वच्छता हि सेवा अभियान राबविण्यात येत आहे तसेच सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण माह म्हणुण साजरा करण्यात येत आहे. या दोन्ही विषयांचे महत्व लक्षात घेऊन केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड कार्यालयाच्यावतीने दोन दिवसीय प्रसिध्दी अभियानाचे आयोजन करण्यतात येत आहे.

बारूळ येथे राबविण्यात येणा-या दोन दिवसीय अभियानात दि. 23 रोजी स्वच्छतेचे महत्व आणि पोषण आहाराचे महत्व या विषयावर बारूळ येथील श्री. शिवाजी विदयालयाच्या सहभागाने पोष्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राजभाषा हिंदी पंधरवाडा अनुषंगाने निबंध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे..

स्वच्छता हि सेवा अभियानाच्या माध्यमातून श्री. शिवाजी विदयालयाचे विदयार्थी, ग्रामस्थांच्या सहभागातून
स्वच्छता फेरीचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

दिनांक 24 रोजी बारूळ येथील श्री. शिवाजी विदयालयाच्या प्रांगणात आयोजित होणा-या मुख्य कार्यक्रमात स्वचछता हि सेवा आणि पोषण आहाराचे महत्व या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून बालविकास प्रकल्प कार्यालय, कंधार यांच्या अंगणवाडींच्या माध्यमातून पोषण आहार पाककृतींचे प्रदर्शन भरिवण्यात येणार आहे.स्वरसंगम सेवाभावी संस्था, माळाकोळी यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमोच आयोजन देखील करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप, बालविकास प्रकल्प अधिकारी लिंगुराम राजुरे, सरपंच श्रीमती जनाबाई वाघमारे, जि.प. नांदेडचे स्वच्छता तज्ञ मिलींद व्यवहारे आदींची प्रमुख उपस्थीती असणार आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल, बालविकास प्रकल्प अधिकारी लिंगुराम राजुरे, ग्रामविकास अधिकारी व्यकंट आदमपुरकर, मुख्याध्यापक अनिल वटटमवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *