पिंपळगाव महादेव ता. अर्धापूर येथे रविवारी दुपारी भोकर विधानसभा मतदारसंघातील भाजप बुथप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, भाजपचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी २५ सप्टेंबरपासून भोकर विधानसभेत बुथ प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार असल्याची घोषणा केली.