विश्वास प्रकाश खांडेकर हे एक नांदेड मधील प्रख्यात संस्कृतचे प्राध्यापक उर्फ आदर्श शिक्षक यांचे निधन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
निशब्द, निशब्द निशब्द…. काय बोलावं काय लिहावं ,काही सुचत नाही. कारण घटना ही तशीच आहे. आज सकाळी सकाळी मी पुण्याहून ट्रेनमध्ये येत असताना अचानक माझा मावस भाऊ विक्रम उर्फ विकी याचा मला फोन खणखणला! दादा मला आज माझा भाऊ विशू दादा सोडून गेला आहे. आज पासून मी पोरका झालो आहे .तू माझा सांभाळ कर!
मी रेल्वे मध्ये होतो नांदेडच्या दिशेने येत होतो .पण तो आलेला फोन माझे काळीज फाटावे असे झाले.जसे काही मला काहीच सुचत नव्हते .पण मीही त्याला विश्वासात घेऊन धीर दिला पण विक्रमचं पुढील आयुष्य हे काळोखात आहे हे मला सत्य सतत समोर दिसत होते.विश्वास प्रकाश खांडेकर हे एक नांदेड मधील प्रख्यात संस्कृतचे प्राध्यापक उर्फ आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्धी होती. त्यांच्या हाताखालून शेकडोच्या वर विद्यार्थी ही घडलेली आहेत. विश्वास म्हणजे एक ताठर भूमिका घेणारा, जिद्दी, सतत अथक परिश्रम करणारा, शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची जिद्द बाळगणारा, व्यवहारिक, विश्वासू, प्रामाणिक विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांमध्ये ते आवडते शिक्षक जरी असले तरीही ते कडक व शिस्तप्रिय शिक्षक होते. त्यामुळेच त्यांचे सिडको व नांदेड परिसरात एक विशेष नाव होते. पण त्यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून मार्ग काढत कुटुंबाला सांभाळ केला. आणि जेवढे सुख देता येईल तेवढे सुख त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनाचा विकास झाला .पण अति कष्टामुळे त्यांच्या जीवनाकडे ज्यावेळेस आनंद घ्यायची वेळ आली त्यावेळेस तब्येतीने त्यांची साथ सोडली व गेल्या अनेक महिन्यापासून ते एका विशिष्ट आजाराने आजारी होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.
विक्रम उर्फ विकी तसेच विश्वास हे दोघे सख्खे भाऊ पण सुरुवातीला काही वर्षाखाली वडील तर गेल्या दोन वर्षाखाली त्यांची आई तर आता खुद्द विश्वास खांडेकर यांनी विकीची साथ सोडल्यामुळे या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या चार दिवसा खाली मी स्वतः विश्वास खांडेकर एवढे आजारी असताना त्यांना हसविले ते हसत असताना बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू बघितल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंद अश्रू आले पण आज ते पडद्याआड जात असताना मात्र यांच्या कुटुंबातील विश्वास गमावला याचे मात्र खूप दुःख होत आहे.
वृत्त लिहित असताना माझ्याही मनाला खूप यातना होतात .पण नियतीचा खेळ आहे. जेव्हा शरीर चांगले होते त्यावेळेस यांच्याकडे पैसा नव्हता आज पैसा आहे पण शरीराने साथ सोडली.विश्वास खांडेकर यांची मेहनत पाहिली तर कदाचित आपण झोपू शकणार नाहीत. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा भाऊ विकी याचा सिंहाचा वाटा आहे हे सत्य टाळता येऊ शकत नाही. कारण त्यांच्या प्रत्येक सुख आणि दुःखात हा विकी विश्वास सोबत सावली प्रमाणे राहिला आहे. त्यामुळे विश्वासाचे शेवटचे हसू ….आणि डोळ्यात अश्रू… अखेर विश्वास गमावला असे वाटत आहे. माझ्या या मावस भावाला भावपूर्ण श्रद्धांजली
ओंकार लव्हेकर,कंधार