कंधार तालुक्यात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते रेकॉर्ड ब्रेक विविध विकास कामाचे उदघाटन*……!! *आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते आज कंधार शहरातील 37 कोटी रुपये कामाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न*

 

 

कंधार

कंधार लोहा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी उपलब्ध करून दिले. या निधीतून रस्ते, आरोग्य, सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात मोठ्याप्रमाणात यश आले. आम्ही नुसते आश्वासन देऊन थांबलो नाही तर आश्वासन पूर्ण करून दाखवली. कंधार शहरातील मुख्य मार्ग असो की उपजिल्हा रुग्णालय असो, बाजार समिती येथील रस्ता असो शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला. लोहा शहरात ही कोट्यावधींची विकास कामे झाली. आगामी काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबध्द आहे. असे प्रतिपादन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले.

कंधार येथील महाराणा प्रतापसिंह चौकात महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी चौक पर्यंतच्या 10 कोटी रूपयाच्या सीसी रस्त्याचे लोकार्पण,महाराणा प्रताप चौक ते गुलाबवाडी 7.3 कोटी रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण,मार्केट कमिटी परिसरातील 5 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे लोकार्पण तसेच कोडबाजार किल्ला परिसरातील 5 कोटी रुपयांच्या रस्ताचे उद्घाटन, नगरपालिका अंतर्गत 5 कोटी रुपयांच्या सी सी रस्त्यांचे उद्घाटन दि. २५ सप्टेंबर रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष राहेरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे, युवा नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विक्रांतदादा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार -पानभोसी- आंबेसांगवी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग महाराणा प्रताप सिंह चौक ते गुलाबवाडी या रस्त्याचे पुलमोऱ्या सह कॉंक्रिटीकरण करणे. कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड परिसरातील
मुत्तेपवार ते शिवाजी केंद्रे यांच्या दुकानापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे, मोहन महाजन ते मुंडे यांच्या दुकानापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे, कंधार -घोडज रोड ते मुत्तेपवार यांच्या दुकानापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे.
कंधार कुरुळा रोड ते मुंडे यांच्या दुकानापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे, कंधार- घोडज रोड ते शिवाजी केंद्रे यांच्या दुकानापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे, कंधार मार्केट कमिटी यार्ड मध्ये विद्युतीकरण व पाणीपुरवठा करणे. कंधार येथील मौर्यकालीन भुईकोट किल्ल्यास पोचमार्ग व स्वछता गृह बांधकाम करणे. कंधार नगर परिषद हद्दीतील कंधार- घोडज रोड ते मुक्ताईनगर रोड सुभाष केंद्रे यांच्या घराकडे जाणारा रस्ता सिसी रस्ता व नाली बांधकाम करणे, विधी महाविद्यालय ते मायीचे मंदिरा पर्यंत सिसि रस्ता व नाली बांधकाम करणे.
छ. शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिर ते गांधी चौका पर्यंत सिसि रस्ता व नाली बांधकाम करणे, शिवाजी नगर येथे सि सि रस्ता व नाली बांधकाम करणे, रमाई नगर येथे सि सि रस्ता व नाली बांधकाम करणे असे ३७ कोटीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.यावेळी उपस्थितांना सौ. आशाताई शिंदे व विक्रांत दादा शिंदे यांनीही विविध विकासकामांचा आढावा सांगत उपस्थितांना संबोधित केले.यावेळी सार्वजनिक बांधकाम उप कार्यकारी अभियंता सुमित पाटील, माजी सभापती द्यानेश्र्वर चोंडे,सभापती लोहा स्वप्नील उमरेकर, पुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच मोहन काका शुर, बालाजीराव इसातकर, मनाल भाई चौधरी, सिद्धू पाटील वडजे, शेख शेरू भाई, शिवाजीराव केंद्रे, गांधी पाटील मोरे, माधवराव घोरबांड, राम पाटील गोरे, अवधूत पेटकर, महेश पिनाटे, कोंडीबा पाटील मोरे,सद्दाम भाई,नवनाथ बनसोडे,गिरीश सावकार मामडे सह कार्यक्रमाला शहर व परिसरातील हजारो नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *