एकदा कोणीतरी म्हणालं होतं की काही जातीत आदरणीय व्यासपीठ हा शब्द वापरायला बंदी आहे .. ऐकून वाईट वाटलं होतं पण आता मी प्रत्यक्षात अनुभवलं तेव्हा काहीही वाटलं नाही , ना दुख झालं , ना किव आली ना मत्सर वाटला.. त्यावेळी माझ्याकडे एक वेगळीच एनर्जी होती…कारण माहीत नाही.. सगळा प्रसंग उलगडुन सांगते म्हणजे लक्षात येइल् .. लोकांच्या मनात आणि शरीरात इतकं विष आहे की यांना भगवंताचे नावही नकोय … कुठलाही देव नाही असच त्यांनी व्यासपीठावरून जाहीर केलं आणि मनात म्हटलं , श्रीकृष्णा वेळ आली की सगळ्याना दाखवून दे ..
मी एका कार्यक्रमाला वक्ती म्हणुन गेले होते.. त्यांनी एक विषय दिला होता ज्यावर अजून दोन वक्तेही बोलणार होते.. सुरुवात माझ्यापासुन झाली होती.. जेव्हा मी स्टेजवर गेले तोपर्यंत किवा त्यानंतरही तो कार्यक्रम एका ठरावीक जातीचा होता हे माहीत नव्हतं आणि मी कायमच जात धर्माच्य विरूध्द आहे.. पुसटशी कल्पनाही माझ्या मनाला शिवली नाही कारण मी माणूस म्हणुन माझ्याकडे असलेलं ज्ञान तिथे द्यायला गेले होते.. त्यासाठी त्यांनी मला मानधनही दिलं होतं.. भाषणाचा विषय सामाजिक होता पण डोक्यात जातीचे किडे वळवळत होते आणि यात तरुण पिढी बरबाद होणार ही शंकाच नाही ..
नेहमीप्रमाणे डाएस वर गेल्यावर मी आदरणीय व्यासपीठ असं म्हणत बोलायला सुरुवात केली आणि संपल्यावर जागेवर येउन बसले तर त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि अजून एक वक्त्या यांचं म्हणणं होतं की देव नाहीच.. तो काहीच करु शकत नाही आणि हे ऐकायला समोर बसलेला वयोगट हा वयवर्षे १० ते पुढे असा होता.. तामसी आहाराने आपली वृत्ती तशीच बनते हे त्या कोणालाही पटलं नाही .. एक वक्ता हा मनाचे श्लोक , श्रीमद्भागवत यावर बोलतो आणि दुसरा त्याच्या विरूध्द बोलून समोरच्याच्या मनात नास्तिकपणा उतरवतो हे किती वाईट आहे हे प्रकर्षाने जाणवलं.. तरुण मुलानी काय आदर्श ठेवावा हा प्रश्न त्या बिचाऱ्या मुलांना पडला असेल.. अशाने पिढी घडणार नाही तर वाया जाणार कारण मद्यपान , मांसाहार याने वृत्ती तामसी होते हे शास्त्रातही सांगितले आहे पण जिभेचे चोचले पुरवत असताना शरीरावर आणि मनावर होणारे त्याचे परिणाम याची कोणाला परवाच नाही..
बलात्कारासारख्या विषयाचा संबंध हा लैगिक ज्ञानाशी नक्कीच जोडलेला आहे आणि त्याच्या जोडीला आध्यात्मिक ज्ञान असेल तर माणूस आतुन शांत होतो.. तो त्याच्या इंद्रीयांवर ताबा ठेउ शकतो .. ज्या भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली त्यालाच आपण नाकारतो.. ज्याने हे ज्ञान दिले त्यावर आपला विश्वास नाही .. मग ही सगळी निर्मिती नक्की कोणाची आहे हा प्रश्न यांना पडत नाही याचं नवल वाटलं.. जी जाता जात नाही ती जात आणि ज्यामुळे आपली कधीही प्रगती होणार नाही तो विषारी मनुष्य .. समाजात वाईट गोष्टी पसरवायला बसलेले हे तरुण रक्त आणि होणारा समाजाचा ऱ्हास सगळच भयावह आहे .. यात कधीही सुधारणा होणार नाही हे तितकच सत्य आहे कारण जिथे असत्य आहे तिथे सत्य रहात नाही आणि जिथे वाईट गोष्टी घडतात तिथे भगवंत वास करत नाही.. मी माझं काम केलं शेवटी कोणाची कर्म कोणीही बदलू शकत नाही.. वाईट याच गोष्टीचं वाटतं की , कोवळ्या मनावर ओरखडे पडतात आणि समाधान याचं आहे की समोर बसलेल्या लोकांच्या कानावर मी काही चांगल्या गोष्टी घालु शकले..
मानसिक आणि शारीरिक बलात्कार हे अशा वृत्तीने वाढणार यात शंकाच नाही कारण त्यामागची भावना शुध्द असली तरी विचारसरणी ही बुरसटलेली होती.. वैचारिक दृष्ट्या जोपर्यंत आपण बदलत नाही आणि जात धर्म डोक्यातुन जात नाही तोपर्यंत काहीही बदल होवु शकत नाही.. माझ्या पोस्ट या कायम सकारात्मक असतात आणि सत्यही असतात पण ज्या व्यासानी हे ग्रंथ लिहीले त्यांचं नावही नकोहे नक्कीच लज्जास्पद आहे.. आपल्याला खुप बदलायची गरज आहे हे मात्र नक्की..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist