पितृपक्षात नवीन वस्तु खरेदी का करु नये ??

 

पितृपक्ष आणि चातुर्मास किवा ओव्हरऑल आयुष्याबद्दलच आपल्या मनात अनेक संभ्रम आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे शास्त्राचा योग्य पध्दतीने अभ्यास नाही.. अध्यात्मिक ज्ञान हे परंपरेने येतं त्यासाठी गुरु हवा पण तोही परंपरेने आलेला असावा.. माझ्या आई ने केलं म्हणुन मी करते किवा माझ्या सासू करते म्हणुन मी करते पण यांच्याकडे असलेलं ज्ञान हे खरच शास्त्र आणि विज्ञान यातून आलय का ??.. कि अंधश्रद्धा फॉलो केल्या जात आहेत.. नक्की कारणं काय आहेत ??.. श्रावणात दाढी का करु नये ??.. पितृपक्षात नखं का कापु नयेत ??.. नवीन वस्त्रे , वहाने , घरे किवा उद्घााटने का करु नये ??.. कावळ्यालाच का खाऊ द्यायचा ??.. खरच कावळा अशुभ असतो का ??.. यामागे शास्त्र आहे ते समजून घेतलं तर शुभ , अशुभ असं काहीही नाही हे लक्षात येइल.. चातुर्मासात कांदा लसूण का खाऊ नये?.. प्रश्न अनेक पडतात पण उत्तर कोणीही शोधत नाही कारण कोणाला अभ्यास करायचा नसुन टिकाटिप्पणी करायच्या आहेत… हातात स्मार्ट फोन असतो त्यात सगळं आहे पण ते न वाचता आपण रील्सवर वेळ वाया घालवतो आणि सरतेशेवटी अज्ञानीच रहातो..
नवीन गोष्टी का खरेदी करु नयेत कारण पितृपक्ष हा फक्त १५ दिवसांचा कालावधी असतो .. ३६५ दिवसांतील निदान १५ दिवस तरी आपल्या पुर्वजांच्या आठवणीत आपण घालवावे.. त्यांनी दिलेले संस्कार , विचार , प्रॉपर्टी याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणजेच काय इतर गोष्टीत वेळ वाया न घालवता तो वेळ फक्त त्यांच्यासाठी व्यतीत करावा.. आपण महागड्या वस्तूत रमलो तर आपल्याला त्यांची आठवण येणार नाही हाच उद्देश बाकी अशुभ असं काहीही नाही.. जसं शास्त्र सांगतं गरजेपुरतं कमवा याचाच अर्थ आपण फक्त प्रॉपर्टी पैसा याच्या मागे लागलो तर भगवंताचे विस्मरण होइल .. कारण गरजेपेक्षा कमावून सगळं इथेच सोडून जायचे आहे .. त्याच वेळात जर हरिनाम घेतले तर आपल्याला मोक्षाचा मार्ग मोकळा होवु शकतो किवा मोक्ष मिळाला नाही तर पुढचा जन्म चांगल्या घरात मिळु शकतो.. आणि हेच फक्त सोबत जाते.. मग जे सोबत नेणारच नाही त्यात वेळ वाया का घालवायचा ??.. अगदी सहज सरळ आणि सुंदर आहे.. यात शंका घेण्यासारखे काहीही नाही .. प्रत्येक सण हे त्या त्या नात्याची कृतज्ञता पुर्तीसाठी दिलेले आहेत.. हा काळ म्हणजे कावळ्यांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे कावळे नष्ट होवु नयेत किवा त्यांची पिल्ले हेल्दी जन्माला यावीत म्हणुन सुध्दा त्यांना चांगले खाऊ घालायचे .. आपला निसर्ग हा या सगळ्या प्राणी पक्षामुळे आहे आणि त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.. या महिन्यात भरपूर दान करावे पण तेही योग्य ठिकाणी कारण आपण गृहस्थ मंडळी ही उरलेल्या तीन आश्रमाना जगवु शकतो म्हणजेच काय तर आपल्या कमाईतला ठरावीक भाग हा समाजासाठी वापरला जायलाच हवा.. जिवो जिवोत्स जीवनम.. याचनुसार आपण कुठल्याही अपेक्षेशिवाय गो दान , ब्राह्मण दान , अन्न दान , वस्त्र दान या गोष्टी करु शकतो.. कर्मण्ये वादिकारस्ते मा फलेषु कदाचन… हे श्रीकृष्णाचे एक वाक्य कायम लक्षात ठेवून जगलो तर वेगळं काहीही करायची गरज नाही फक्त गरज आहे आपली विचारसरणी बदलण्याची.. नव्याने या सगळ्याकडे पाहिलत तर लक्षात येइल की , जात , धर्म काहीही नाही तर विचार आणि ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे..
संतांनी हरिनाम घ्यायला याचसाठी सांगितले आहे … हरिमुखे म्हणा , हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट ही निसर्ग आणि भगवंताशी कनेक्ट करता यायला हवी..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *