*मी शिवाजीला पकडून चढेघोड्यानीशी दरबारला हजर करीन, तसा नाही सापडला तर त्याचे शीर कापून दरबारला हजर करीन. असे म्हणून अफजल खानाने विजापूर दरबारी शिवरायांचा बिमोड करण्याचा विडा उचलला आणि स्वराज्यावर चालून आला.*
आंबेडकरांचा बालेकिल्ला आंबेडकरवाद्याच्याच हाताने उध्वस्त करू असे जाहीर आव्हान देऊन आंबेडकरी चळवळ बिमोड करण्याचा विडा काँग्रेसवाल्यांनी उचलला आहे….. त्यासाठी त्यांनी पहिले हत्यार उपासले ते रिटायर्ड अधिकारी गँगचे. या गँगला काँग्रेसने सर्व रसद पुरविली. गँगने इमाने इतबारे आदेशाचे पालन केले. त्यांनी दुसरे हत्यार उपासले ते साहित्यिक मंडळीचे. या मंडळींनी ही पूर्ण इमानदारीने आदेशाचे पालन केले. आता तिसरे हत्यार उपसले आहे ते कलाकारांचे, प्रबोधनकाराचे. हे कलाकार, प्रबोधनकार गावगावी जाऊन काँग्रेसचा प्रचार करणार आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर कसे हेकेखोर आहेत ते लोकांना पटवून देणार आहेत. या सर्वांचे म्हणणे एकच आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस देईल तेवढ्या जागा घेऊन आंबेडकरी समुहाची मते काँग्रेस च्या झोळीत टाकावी. स्वबळावर आपण निवडून येऊ शकत नाही त्यासाठी भागते चोर की लंगोटी सही म्हणून स्वतः लोकसभेत जावे. चार दोन चेले महाराष्ट्र विधानसभेत पाठवावेत बस….
असे आहे आमच्या विचारवंत मंडळीच्या विचाराचा आवका…. हे सतत म्हणतात तुम्ही काँग्रेस सोबत युती करा पण ते काँग्रेसला सांगत नाहीत की काँग्रेसवाल्यांनो तुम्ही वंचित सोबत युती करा. काँग्रेस ला गरज नाही फक्त वंचितवाले त्यांच्या मागे फरफटत गेले पाहिजेत बस…..
या सर्वांना कळते ती गोष्ट बाळासाहेब आंबेडकर यांना कळत नसेल का?
सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना बाळासाहेब आंबेडकरांनी युतीचा प्रयोग करून पहिला. युती धर्माप्रमाणे काँग्रेस आणि भारिप च्या मतांची बेरीज होऊन काँग्रेस आणि भारिपचे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते मात्र काँग्रेसचे उमेदवार जिंकले आणि भारिपचे उमेदवार सपाटून पाडले. जिथे काँग्रेस आणि भारिप यांच्या मताची बेरीज लाखभर होते तिथे सेना bjp चे उमेदवार निवडून आले. काँग्रेसची मते गेली कुठे? सेना bjp च्या मतांचा टक्का कसा काय वाढला? इथे घोळ असा झाला की आमची मते डायव्हर्ट होऊन काँग्रेस उमेदवार विजयी झाला पण जिथे भारिपचा उमेदवार उभा होता तिथे काँग्रेसची मते सेना bjp ला पडली. काँग्रेस ने युती धर्म पळाला का? युतीत राहूनही पडत असू तर स्वबळावर लढून पडलेले काय वाईट आह
*सत्य कथा*
एकदा आमच्या दिगंबरराव देशमुख गुरुजींना एका पंक्तीचे निमंत्रण आले. सर्व पाहुणे आत हॉल मध्ये जेवायला बसले. हॉल फूल झाला. देशमुख गुरुजी, कांबळे गुरुजी आणि शेख गुरुजी हे तिघे जेवायचे राहिले. यजमान म्हणाले, गुरुजी तुम्ही अंगणात बसा. कांबळे गुरुजी आणि शेख गुरुजी बसले पण देशमुख गुरुजी काही बसत नाहीत हे पाहून यजमान म्हणाले गुरुजी बसा की. देशमुख गुरुजी म्हणाले तुमच्या खेटरा जवळ बसावं का?
चला रे पोरं हो म्हणून गुरुजी उठून आले. यजमान म्हणाले काय हेकाडी माणूस आहे. अंगणात बसला असता तर पोटभर खाला नसता का? हेकेखोर कुठला….
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत असेच अनेकदा झालेले आहे…. ही बाब आपल्या लक्षात यायला पाहिजे. बाकीचे काय कुठेही बसून खातात. वाढलेले घेतात. पण राजगृहाच्या वारसाला असे पोटापुरते कसे पाहता येईल?
आणि पोटापुरते बघा, तुमच्या पुरते बघा असा सल्ला देण्यासाठी काँग्रेस च्या रसदिवर जगणारे जे विचारवंत येतील, जे निवृत्त अधिकारी येतील, जे आंबेडकरी प्रबोधनकार येतील, जलसाकार येतील व म्हणतील काँग्रेस संविधानाचे रक्षण करणार आहे. लोकशाही वाचवणार आहे. काँग्रेसला मते द्या पण त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका अशा कार्यक्रमास जाऊ नका…..गणपत गायकवाड नांदेड
9527881901