श्यामसुंदर शिंदे यांना आमदार करून आमची मोठी चूक झाली- मा.खा. प्रतापराव चिखलीकर! उपकार केल्याची भाषा करणाऱ्याला जेलमध्ये जाण्यापासून मी वाचवलं.

 

*कंधार प्रतिनिधी- संतोष कांबळे*

कंधार शहरातील विकासासाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून १४ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतील अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा दिनांक २७ सप्टेंबर रोजी खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या हस्ते माजी खा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी उमरज मठाधिपती महंत श्री संत महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज उम्रजकर, मठाधिपती श्री गुरु नागेंद्र गयबी महाराज मठ संस्थान पानभोसी, लोहा कंधार विधानसभा प्रभारी भरत भाटियारा, प्रविण पा. चिखलीकर, प्रणिताताई चिखलीकर, मनोहर पा तेलंग, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कंधार तालुक्यातील नगरेश्र्वर मंदिरात आयोजित सभेत बोलताना माजी खा प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, गेल्या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे यांना आमदार करून आमची मोठी चूक झाली. त्यामुळे मतदारसंघाचे खूप मोठे नुकसान झाले असून ही चूक भरून काढण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हेच भारतीय जनता पार्टी कडून उमेदवार असतील आणि त्यांना मोठ्या लीडने निवडून द्यावे अशी तुमच्याकडून अपेक्षा असल्याचे साद घातली. यावेळी बोलताना श्यामसुंदर शिंदे यांच्यावर सडकून टीका कली. आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की,एका हाताने टाळी वाजत नसून त्यांनी माझ्यावर उपकार केले असेल तरी मी ही त्यांच्यावर मोठे उपकार केले आहेत. लोक मला विचारतात की श्यामसुंदर शिंदे हे इतक्या दिवस आयएएस अधिकारी या पदावर कसे राहिले त्या पाठीमागे ही प्रताप पाटील चिखलीकर यांचे सहकार्य होते म्हणून इतक्या दिवस ते राहिले.अडीचशे कोटी रुपयांचे तलाव आणल्याचे भाषणातून सांगत आहेत खरच त्यांनी मंजूर करून आणले असले तर एखाद्या तरी तलावाचे नारळ फोडून दाखवावे असे आवाहन चिखलीकर यांनी केले. आमदार श्यामसुंदर यांच्या सोबतच शिवसेनेचे महाराष्ट्र संघटक एकनाथ पवार यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. पुण्याच्या लोकांनी नाकारल्याने या ठिकाणी आमदारकीचे स्वप्न बघत आहेत. या भुरट्या लोकांना मी जास्तीचे महत्व देत नसून कंधार लोहा मतदारसंघातील जनता ही खूप हुशार आहे.गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्या सुखा दुखात सामील झालो आहे. या निवडणुकीत मोठ्या लीडने मला निवडून देतील अशी आशा प्रताप पा. चिखलीकर यांनी व्यक्त केली.
कंधार शहरातील १४.१७ कोटी विकास कामाच्या भूमिपूजनाचे व उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कामांमध्ये हुतात्मा स्मारक येथील गोविंदराव पा चिखलीकर उद्यानास तीन कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आले मानसपूरी ते संगुचीवडी इजिमा १०८ (मानसपूरी ते बेलाची महादेव) सीसी रस्ता करणे. ५ कोटी.कंधार येथील वीरमाधव नगर ते भगवान बाबा मंदिर सभागृहापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे. १ कोटी ४७ लक्ष. कंधार येथील स्वप्नभूमी नगर येथे संभाजी केंद्रे ते वारे त गव्हाने यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे. १ कोटी १ लक्ष. कंधार येथील जलशुद्धीकरणाची सुधारणा व बळकटीकरण करणे. ५५ लक्ष. कंधार येथील खडंकी देवी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, विजय गड येथील बौद्ध विहार सभागृह व भगवानबाबा मंदिर, साईबाबा मंदिर, सुलेमान शहा दर्गा येथे संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. १ कोटी ५ लक्ष. कंधार येथील सिद्धार्थ नगर अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे, ७० लक्ष . प्रभाग क्र. १ मध्ये निवृत्ती वाघमारे, मुंडे, पोचीराम वाघमारे ते निरजगावे व प्रभाग क्र. ७ मध्ये डॉ. फाजगे ते डॉ. कागणे, डॉ. केंद्रे यांच्या हास्पिटल पर्यंत सीसी रस्ता करणे, १ कोटी ३० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात करण्यात आले.या वेळी मामा गायकवाड यांच्या माध्यमातून राउतखेडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केले.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष किशनराव डफडे,मनोहर पा.तेलंग,भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव राठोड,संजय देशमुख,हावगीरराव गोपछडे,कंधार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जफरोदिन बाहोद्दिन,माजी नगरसेवक बालाजीराव पवार,निलेश गौर,बाळासाहेब पाटील गर्जे,वारकड गुरुजी,तहसीलदार रामेश्वर गोरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुमित पाटील,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पाटील,मधुकर पाटील डांगे,भारतीय जनता पार्टी लोकसभा विस्तारक गंगाप्रसाद यन्नावार,भारतीय जनता पार्टी विधानसभा विस्तारक साईनाथ कोळगिरे,अनुसयाताई चेतन केंद्रे,जयमंगलाताई औरादकर,वरपडे सर,आसेफ शेख,रजत शहापुरे यांच्यासह सन्मा.कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्यासह हजारो जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड .गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले तर आभार किशनराव डफडे यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *