कंधार : कंधार तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व सभासदाना ग्वाही दिली आहे. ते कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे ऊदघाटन त्यांच्या हास्ते करण्यात आले त्यावेळी ते बलताना म्हणाले.
कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा २८ सप्टेबर रोजी खरदे विक्री संघाच्या कार्यालयात घेण्यात आली.या वार्षिक सभेच्या अध्यस्थानी कंधार तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती प्राचार्य किशनराव डफडे सर होते तर उद्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर होते. तर प्रमख पाहुने म्हणून बाबुराव केंद्रे उमरगेकर, दत्ता चंदनफूले, भगवान राठोड, संजय देशमुख, आण्णा साहेब कदम,दत्ता घोरबांड , राजू मुकनर नंदनशिवणीकर, कालीदास गंगावरे, अंगत केंद्रे, राजकुमार केकाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
प्रथम कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सभापती प्राचार्य किशनराव डफडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करुन दाखवले आणि खरेदी विक्री संघावर मध्येवर्ती बॅकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याचे माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निदर्शनास आनुन दिले. आहे.
आपल्या भाषणात पुढे बोलताना माजी खा. चिखलीकर म्हणाले की कंधार तालुका खरेदी विक्री संघ बंद पाडण्याचा घाट कोणी घातला त्याच्या खोलात मी जाणार नाही. परंतू मराठवाड्यात सगळ्यात चांगला संघ कोणता तर कंधारचा असे खरेदी विक्री संघाचे नाव लौकीक करण्यासाठी सगळ्यानी मिळून आपणाला भूमिका वटवायची आहे.या खरेदी विक्री संघाचे वैभव जे मागच्या काळात होत.शेतकर्यासाठी सगळ्या सुविधा मिळवून देणे कै. शंकरराव चव्हाण आणि कै. श्यामरावजी कदम यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सगळ्या संस्था पुर्णजिवित करुन चांगल्या चालवून शेतकर्याना न्याय देणार असल्याचे शेवटी चिखलीकरांनी सांगीतले. यावेळी सर्व संचालक मंडळ, सर्व सहकारी सोसायटीचे चेअरमन बहूसंख्येनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचलन आर .के वरपडे यानी केले आहे. या कार्यक्रमास संघाचे व्यवस्थापक बी.आर बनसोडे, ञ्यंबकराव भोसीकर, श्यामसुंदर शिंदे मांजरमकर,साईनाथ कोळगीरे, आकाश मठपती, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .