*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष सवलती दिल्यात.यात लालपरी एसटी बसचा सुध्दा समावेश आहे.ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शहरी भागात जाऊन शिक्षण घेत आहेत.मात्र बससेवा वेळेवर नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने शेकापूर, पानशेवडी, गुट्टेवाडी, पोखर्णी, सोमठाणा, उमरगा मार्गे बस सेवा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या मार्फत करण्यात आली.
दरम्यान खाजगी वाहन चालकांकडून वाढवी भाडे आकारून विद्यार्थी तसेच प्रवाशांची लुट होत आहे. तसेच वाहना अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शेकापूर ते उमरगा परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बस नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष संदीप पा. तोंडचिरे यांनी कंधार आगाराचे आगार प्रमुख यांना दिले.
कंधार तालुक्यातील शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनी ग्रामीण भागातून येतात शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकार विविध योजना अमलात आणत असते. परंतु खेडेगावामध्ये बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे शेकापूर, पानशेवडी, गुट्टेवाडी, पोखर्णी, सोमठाणा, उमरगा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बसेस उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे कंधार तालुका अध्यक्ष यांच्या वतीने कंधार शेकापूर,पानशेवडी, गुट्टेवाडी, पोखर्णी सोमठाणा,उमरगा मार्गे सकाळी सात वाजता आणि दुपारी दोन वाजता बस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संदीप पा. तोंडचीरे यांच्यासह अनिल गिरी, सुनील अनकाडे, अनिल चोंडे, मारोती चोंडे,कृष्णा दैठणकर,खुशाल केंद्रे, सिद्धेश्वर चोंडे,संगमेश्वर चोंडे,जयदीप वाघमारे,कृष्णा अनकाडे, देवानंद चोंडे, सिद्धार्थ शंकपाळे, सिद्धेश्वर तोंडराव, कृष्णा जाधव, किशोर लामतुरे, महेश अनकाडे, माधव चोंडे, अजय देशमुख, गोपाळ केंद्रे ,निखिल वाघमारे, मन्मथ होनराव, सुरेश केंद्रे यांच्या स्वाक्षरी आहेत.