नांदेड: (दादाराव आगलावे)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानिक नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेचे प्राचार्य भगवानराव पवळे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.वसंत राठोड, हायस्कूलचे पर्यवेक्षक सत्यवान पारेकर यांनी प्रतिमा पूजन केले. अभिवादनानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भगवानराव पोवळे म्हणाले की, महात्मा गांधींचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याची महत्ती आजही आपल्याला शिकवते की शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. दर वर्षी गांधी जयंती २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वाचे योगदान आहे. यावेळी प्रा. कौशल्य यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कौसल्ये यांनी केले. कार्यक्रमास हायस्कूल विभागाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि ज्युनिअर विभागाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.