नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण

 

 

नांदेड  ;  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्ग ,वंदे भारत एक्सप्रेससह रेल्वेचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे खा.चव्हाण यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले यावेळी खा. नागेश पाटील आष्टीकर ,खा. फोजीया खान,खा. बंडू जाधव, खा. संजय देशमुख ,दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन ,डीआरएम निती सरकार व रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीत उपस्थित केलेल्या मागण्यांची माहिती दिली आहे.

यावेळी खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की,रेल्वे मार्गांच्या खर्चाचा अर्धा वाटा राज्य शासन उचलणार आहे. यामुळे नांदेड -बिदर व नांदेड -लातूर या मार्गाचे काम तातडीने हाती घेऊन वेळेत पूर्ण करावे ज्यामुळे मूंबईसह विविध मार्गाकडे जातांना कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे प्रवासाला आता लागणार वेळ आणखी कमी होणार आहे. नांदेड जिल्ह्याचा रेल्वेचा कारभार काही स्टेशन नांदेड विभागात तर काही सिकंदराबाद मध्ये यामुळे कामास विलंब होतो यासाठी नांदेड जिल्ह्याच्या सर्व स्थानक ,मार्गाची जबाबदारी केवळ नांदेड विभागाकडेच असावी. जालना पर्यंत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड पर्यंत विस्तार करावा तसेच मूंबई -छत्रपती संभाजीनगर -नांदेड -हैद्राबाद अशी नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करावी अशी मागणीही खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

स्वछतेवर फोकस करा -खा. चव्हाण

बहुतांश रेल्वेच्या डब्यात अस्वछता दिसून येते विशेषतः स्वच्छतागृहांत तर अस्वछतेचा कळस असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. रेल्वे प्रशासनाने स्वच्छ ट्रेन्स व स्वच्छ स्थानके यावर फोकस करावे अशी मागणीही माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *