नवरा माझा नवसाचा 2

खळखळून हसायला लावणारा मराठी
चित्रपट, म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा 2’

अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव या कलाकारांच्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन… हा सिनेमा आजही टीव्हीवर लागला की घरात हास्य लहरी उमटतात. आता पुन्हा एकदा खळखळून हसायला तयार व्हा… कारण ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. एस टी बस प्रवासात ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडली आहे. खळखळून हसायला लावणारा मराठी चित्रपट, म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा 2’ मी पाहिला आहे तुम्ही पण नक्कीच पहा. आणि जगण्याचा खरा आनंद लुटा…धन्यवाद

 

 

युवा साहित्यिक : सोनू दरेगावकर, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *