आज ०२ आक्टों २४. घरी चि मेघराज पां आमलापुरेचा,दारी पत्रकार मित्र धोंडिबा बोरगावे यांचा तर शेजारी प्रा डॉ जगन्नाथ तुडमे सर यांचा आज वाढदिवस. येथे दारी म्हणजे फुलवळ येथे आणि शेजारी म्हणजे वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर ता अंबाजोगाई येथे असं वाचावं, असं समजून घ्यावं. प्रथमतः चि मेघराज पां आमलापुरे, पत्रकार मित्र धोंडिबा बोरगावे सर आणि प्रा जगन्नाथ तुडमे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
रविवार दि ०८ सप्टेंबर 24 रोजी मी शामची आई हे पुज्य साने गुरुजी यांचे पुस्तक तिसऱ्या वेळेस विकत घेतलो. दि १२ सप्टेंबर 24 रोजी पानं क्रमांक ५२ वरील, रात्र ०५ , मथुरी हा पाठ वाचत होतो. तेंव्हा अगदी सुरुवातीचाच परिच्छेद वाचताना मला पत्रकार मित्र धोंडिबा बोरगावे सर यांची आठवण झाली.
तो परिच्छेद असा आहे. मित्रांनो! मनुष्य गरिब असला, बाहेर दरिद्री असला , तरी मनाने त्याने श्रीमंत असावे.
जगातील पुष्कळशी दु:ख ह्रदयातील दारिद्र्यामुळं उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो ; परंतु भारतीय ह्रदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झालं.
इथे बोरगावे सर आठवण्याचे कारण म्हणजे ते अधुनमधून मला आणि इतरांना पण म्हणतात, सर आपणास बाकी कशाचीच कमतरता नाही आहे.कमतरता आहे ती एकाच गोष्टीची. आपल्याकडं भरमसाठ खर्च करायला भरमसाठ पैसे नाहीत. आपण गडगंज श्रीमंत नाही. बस्स एवढच !!!
मला वाटतं हे एवढं म्हणायला सुद्धा मनाची तयारी आणि श्रीमंती पाहिजे. आणि निश्चितच ती श्रीमंती बोरगावे सर कडे आहे.परत एकदा चि मेघराज पां आमलापुरे, पत्रकार मित्र धोंडिबा बोरगावे सर आणि प्रा जगन्नाथ तुडमे सर या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!! अर्थातच तुम्हां सर्व मान्यवरांना आणि चोखंदळ वाचकांना शुभसायंकाळ!!!
प्रा भगवान आमलापुरे
फुलवळ ता कंधार
कै शं गु ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी.
संपर्क: ९६८९०३१३२८