महात्मा गांधींना अभिवादन आणि भिंतीपत्रकाचे विमोचन

 

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

येथून जवळच असलेल्या धर्मापुरी येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 03 आक्टों 24 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ सिरसाठ डी बी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा चाटे एन एस उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कु स्वाती ना सावरगावे,कु दिव्या आ डोईफोडे,मनोज शि कराड, ऋषिकेश द शिंदे आणि सुमित उ मेंगले यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित तयार केलेल्या भिंतीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रा राहुल गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा मुंडे जी आर यांनी केले तर आभार प्रा भगवान आमलापुरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *