जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांच्या सतर्कतेमुळे वाचले हरीणाचे प्राण

 

मुखेड: येथील जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी व इतर सदस्य सकाळी फिरत असताना एका हौदामध्ये हरिण आपला जीव वाचवण्याच्या उद्देशाने तडफडत असलेले पाहिल्यानंतर ताबडतोब जय जोशी यांनी आपल्या सदस्यांना बोलावून हौदातून हरिणास बाहेर काढले व त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.

जिप्सी मॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य सकाळी नियमित फिरत असतात. फिरण्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमही राबवतात. गरजूंना मदत करणे हा त्यांचा सेवाभाव असतो. दैनंदिनी प्रमाणे दि. 3 आक्टोंबर रोजी सकाळी पाच वाजता जिप्सी चे अध्यक्ष जय जोशी, कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे व इतर सदस्य फिरत असताना बा-हाळी रोडवरील गणेश नगरच्या पुढे एका हौदाजवळ संशयीत आवाज येत असल्याची चाहूल जिप्सीचे अध्यक्ष जय जोशी यांना लागली व त्यांनी आपला फिरण्याचा रस्ता सोडून हौदाजवळ आले असता तेथे एक हरीण आपला जीव वाचवण्याच्या हेतूने व्याकुळ झालेले दिसले.

तात्काळ जिप्सीच्या सर्व सदस्यांनी त्या हरीणास आतून बाहेर काढले व त्यावर प्राथमिक उपचार करून फॉरेस्ट ऑफिस च्या कर्मचाऱ्यांकडे त्या हरीणास सुपूर्त केले. जिप्सी चे अध्यक्ष जय जोशी व सर्व सदस्यांनी दाखवलेला प्रसंगावधानामुळे हरीणाचा जीव वाचला. जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *