कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यात फुलवळ चे भुमिपुत्र तथा ग्रामिण भागातील सर्वसामान्य नागरीकांना न्याय मिळवून देणारे पत्रकार धोंडिबा बोरगावे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आज दि ३ ऑक्टोबर रोजी लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर यांच्या हस्ते फुलवळ येथे सत्कार करण्यात आला .
पत्रकार धोंडिबा बोरगावे हे पत्रकारिते सोबतच सध्या जनसेवेसाठी ते राजमाता बहुद्दे शीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असतांना ग्रामीण भागात अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनहीतांची कामे करत आहेत.
फुलवळ पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सतत तिन वेळा पदभार सांभाळत आपल्या सर्व सहकारी पत्रकार बांधवाना सोबत घेऊन जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले पत्रकार भवन फुलवळ सारख्या ग्रामीण भागात मंजूर करून घेतले .आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्रांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात आपली वेगळी ओळख निर्माण करतांना सबंध वाचकांच्या प्रेरणा घेत पञकारीतेला बळ दिले एवढेच नाही तर राजमाता बहुद्दे शीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असतांना अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनहीतांची कामे केली.नांदेड जिल्हात सर्व तालुक्यात कंधार तालुक्यातील फुलवळ या आपल्या जन्म गावाची एक वेगळी ओळख त्यांनी पत्रकारितेतून ात निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून
वाढदिवसाच्या औचित्याने ,लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर,कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा उपसरपंच हनमंतराव पाटील पेठकर, तसेच यशवंत पाटील भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलवळ येथिल राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात आज दि .३ ऑक्टोबर रोजी सत्कार करण्यात आला .