कंधार : प्रतिनिधी
मागील तीन ते चार वर्षापासून मतदार संघात सर्वसामान्य प्रश्न सोडवून नावालौकिकास आलेली माजी सैनिक संघटना आगामी होणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे मतदारसंघात अनेक पक्षांची डोकेदुखी वाढणार असे चित्र दिसत आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून माजी सैनिक संघटना लोहा-कंधार मतदार संघामध्ये सैनिकांचे प्रश्न सोडवत आम जनतेचे पण प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा देऊन निस्वार्थपणे सहकार्य केले. त्यातूनच लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी समोर आले आणि तो मुद्दा आणखीन प्रशासनाच्या दरबारी लावून धरलेला आहे. घरकुल, सिंचन विहिरी, जमिनी नावावर करणे, निराधार, संजय गांधी आशा अनेक योजनेच्या लाभार्थ्यांना मोबदला मोफत मिळवून देण्याचे काम माजी सैनिक संघटनेच्या वतीने चालत आलेले आहे. तालुक्यातील भ्रष्टाचार दलाली मुक्त करण्यासाठी संघटनेचा मोठा पुढाकार असून प्रशासनावर हमेशा लक्ष केंद्रित करून जनतेची लूट होणारं नाही असे कार्य करत असताना प्रशासनाकडून जनतेकडून सहकार्य मिळत असते पण कुठल्याही कार्यामध्ये संघटनेला लोक प्रतिनिधीकडून नेत्यांकडून हमेशा विरोधच होत आहे मग ते काम कुठलेही जनहिताचे असो किंवा सामाजिक असो पण येथील नेते लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थापोटी चांगल्या कामांमध्ये सुद्धा अडथळा निर्माण करत असतात माजी सैनिक संघटना ही काम करत असताना सुद्धा लोक प्रतिनिधीची प्रत्येक ठिकाणी अडवणूक होत असल्यामुळे सत्य असून सुद्धा असत्य ठरवण्यामध्ये लोकप्रतिनिधी यशस्वी ठरत आहेत. सत्ता तिथे शहाणपण असे काम या तालुक्यांमध्ये झालेले आहे आणि आज हा तालुका विकासापासून दूर जाऊन भ्रष्टाचाराचे घर बनलेले आहे.
तालुक्यामध्ये लाईट, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या बाबीवर कुठलाच विकास झालेला नसून एवढंच नव्हे तर ज्यांनी आजी-माजी खासदार आमदारांनी अनेक वर्षे सत्ता भोगली त्यांच्याच गावामध्ये जाण्यासाठी रस्ता करता आला नाही यांना शिक्षण देता आलं नाही यांना आरोग्य देता आलं नाही हे कंधार तालुक्याचे दुर्दैव म्हणूनच आम्ही निर्धार केला आहे की प्रस्थापित घराणेशाहीला मुक्त करून या तालुक्याचा विकास करून राज्यात लोहा-कंधार मतदारसंघाची आणखी वेगळी ओळख करण्याचा निराधार केला आहे म्हणून आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुकलवाड याने निवडणूक लढवण्याचे निर्णय घेतला असल्याचे बोलताना सांगितले.