कोल्हापूर:-
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधी साठी प्रश्न द्यावेत असे आवाहन शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्षा आमदार उमाताई खापरे यांनी केले.
KOP माझा चॅनेल च्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वेतन पथक अधीक्षक सौ कदम मॅडम, राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ, विना अनुदानित संघटनेचे खंडागळे, समितीचे अजय देसाई, एम. डी. पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक राजेंद्र कोरे यांनी केले. यावेळी मानपात्र, सन्मानचिन्ह देऊन शिक्षक, अधिकारी व पत्रकारांचा गौरव करण्यात आला.