*कंधार प्रतिनिधी – संतोष कांबळे*
कंधार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर नागलगाव ही संस्था ग्रामीण भागातील असून या संस्थेतील हजारो विद्यार्थी या संस्थेत शिकून मोठ्या प्रशासकीय पदावर अधिकारी कार्यरत आहे . यामुळे या संस्थेचे नाव राज्यभर गाजत आहे . या संस्थेत नेहमी विविध उपक्रम घेऊन विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देतात . येथील शिक्षक गोवर्धन जाधव सर यांना भारत भुषण राष्ट्रीय पुरस्काराने व राष्ट्रीय आदर्श शिक्षक अशा दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
भारत भुषण राष्ट्रीय पुरस्कार मिस युनिव्हर्स प्रिया राॅय यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी पत्रकार भवन पुणे येथे देण्यात आला. तर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार गोवा विधानसभा अध्यक्ष डाॅ.रमेश तडवळकर यांच्या हस्ते २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रतिनिधी तसेच महात्मा गांधी मानव सेवा संघटनेचे अधिकारी उपस्थित होते व तसेच सैन्य दलातील अधिकारी ,लायन्स क्लब भारतचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल तसेच कोरोना संकट काळात कंधार तालुक्यातील वाडी, तांड्यावर जाऊन मोफत १५ ते १६ महिने विनामूल्य शिक्षण देऊन ज्ञानदान केल्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर येथे कार्यरत असलेले गोवर्धन जाधव सर हे मागील दहा वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य अतिशय उत्तमपणे करीत आहेत पंचक्रोशीत त्यांची ओळख उपक्रमशील शिक्षक,विद्यार्थी प्रिय, उच्चशिक्षित असलेले आणि सतत विद्यार्थी व पालक यांच्या संपर्कात राहून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यशील असणारे सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणून गोवर्धन जाधव यांची ओळख आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची पोच पावती म्हणूनच त्यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
आपल्या संस्थेचे राष्ट्रीय पातळीवर नाव लौकिक केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पवार व सचिव डॉ. विजय पवार, तसेच मुख्याध्यापक श्री पी .यु.पवार, मुख्याध्यापक श्री विजय राठोड, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनी गोवर्धन जाधव यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. गोवर्धन जाधव यांना आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात अकरा पुरस्कार मिळालेले आहे .
शिक्षक पिढी घडवितात त्यामध्ये ते कधीही दुजाभाव करीत नाहीत. कोणतेही संकट आले की शिक्षकांची आठवण येते आणि शिक्षक सुद्धा आपल्या कुटुंबाची पर्वा न करतात दिलेली कामगिरी चोख बजावतात.”‘ असे शिक्षक गोवर्धन जाधव यांनी सांगितले.