रोज श्रीकृष्णाच्या विवीध गुणाबद्द्ल लिहीताना नक्कीच आनंद होतोय पण आपण अशा दिव्य शक्तीच्या विचाराना वाचून सोडून देतो याचं वाईटही वाटतं.. कारण चांगले विचार हे वाचून सोडून द्यायला नसतात तर आपल्यात उतरवून आपल्यात बदल घडवण्यासाठी असतात .. पण आपल्या बेफीकीर वागण्यामुळे , वाचन नसल्याने, मी म्हणेन तीच पुर्वदिशा यामुळे, शास्त्राचा अभ्यास नसल्याने , आणि भगवंतावर श्रध्दा विश्वास नसल्याने या कलियुगात आपण भरकटत चाललोय आणि कृष्ण म्हटलं , की फक्त आपल्याला गोपी आणि राधा आठवते यापेक्षा वेगळी खंत ती काय असावी ना.. आज या नारिंगी रंगाप्रमाणे सध्याचा ज्वलंत आणि या रंगाप्रमाणे भडक विषय म्हणजे बलात्कार..
आपल्याकडे नवरात्र मधे देवीची पुजा केली जाते.. मंदिरात रांगा लावून लोक दर्शन घेतात .. आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पुण्यात बोपदेव घाटात बलात्कार होतो.. कुठे जातो तो स्त्री बद्दलचा आदर.. असं काय होतं त्यावेळी की त्यांना त्यांची बहीण आठवत नाही.. सामूहिक पध्दतीने बलात्कार होताना त्यातल्या एकाला का कृष्ण व्हावं वाटत नाही ??.. भिती नाही , आदर नाही , लैगिकतेचं शिक्षण नाही..इतकी क्रूरता येते कुठुन ??.. काय उपयोग देवीचा जागर करुन ??.. स्त्रीचा आदर कसा ठेवायचा हाच गुण आपण कृष्णाचा पहाणार आहोत.आपल्याला त्याच्या इतक्या बायका दिसतात पण त्या का होत्या याबद्दल कोणालाही जाणून घ्यायचे नाही.. १६ सहस्त्र नारी यांना त्याने राक्षसापासुन वाचवले होते आणि त्यानंतर त्यांच्याशी कोणी विवाह करणार नाही म्हणुन त्यांना कृष्णाने पत्नीचा दर्जा दिला होता.. हा प्रसंग असेल किवा द्रौपदीबद्दलचा प्रसंग असेल हे यांना का आठवत नाहीत ??.. कारण अर्धवट चुकीची माहिती आणि मी किती शहाणा म्हणत भगवंतावर ताशेरे ओढून आपण पटकन मोकळे होतो पण स्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा हा त्याचा गुण आपण पहातच नाही.. एकदा गोपीना गर्व होतो , प्रत्येकीला वाटतं , कान्हा फक्त माझाच.. हे त्याच्या लक्षात येताच तो तीथून निघून जातो कारण गर्व , अहंकार त्याला अजिबात सोसत नाही.. जितका आदर , जितकं राधेवर प्रेम तितकाच एका क्षणात तो विरक्तही होतो.. आणि आपण गर्दीचा फायदा घेउन स्त्रीयांच्या प्रायव्हेट पार्ट ला हात लावतो ,
दिवसाढ्वळ्या रस्त्यात गाठून तिच्यावर अत्याचार करतो.. राजकारणी , जातीधर्म , आरक्षणे यांनी समाजाचं वाटोळं केलय आणि आपण सुशिक्षित असुन अडाण्यासारखे त्यांच्या मागे शेपूट हलवत फिरतो.. कधीतरी कृष्ण बनून पहा.. माणूस म्हणुन कोणाकडेही न पहाता भगवंताचा अंश म्हणुन पहा.. शरीराच्या आत असलेल्या आत्म्याचा विचार करा.. या शरीरामुळे आलेली विकृती याच्या स्मरणाने निघून जाईल.. फक्त तयारी हवी बदलाची आणि स्वतःला बदलून सद्गुण दुसऱ्यापर्यंत पोचवायची..
या सावळ्या हरीकडुन नारिंगी विचारांच्या इंद्रधनु शुभेच्छा..
सोच बदलो.. देश बदलेगा..#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist