नवरात्री स्पेशल…. दिवस पाचवा आजचा रंग पांढरा..

 

नवरात्रीनिमित्त मी रोज एका रंगाला धरुन कृष्णाच्या एका गुणाबद्द्ल लिहीत आहे.. तुम्हाला विषय आणि आशय दोन्ही आवडत असल्याचे मेसेजेस माझ्यापर्यंत येत आहेत त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. कृष्णाला आवडणारं फुल म्हणजे प्राजक्ताचं फुल.. पांढरं स्वच्छ आणि त्याला केशरी देठ .. फुल अगदी नाजूक पण तेही रात्री उमलतं आणि प्रत्येकाची पहाट प्रफुल्लित आणि सुगंधी करुन जातं.. हे फुल इतकं कृष्णाच्या कॅरॅक्टरशी मिळतं जुळतं आहे ना कि जणु काय कृष्णाचच रुप.. अगदी स्वच्छ आणि सुगंधी तरीही काही काळात संपूर्ण अंगण सडा घातल्यासारखं प्रसन्न दिसतं.. कोणीही आणि कितीही तुडवलं तरीही आपला सुगंध सोडत नाही ..हाच कृष्णाचा गुण आपण अंगिकारायचा प्रयत्न करणार आहोत..

कृष्ण म्हणजेच अंधारातून उजेडाकडे नेणारा स्वच्छ हिरा.. ज्याने जन्म अंधारात १२ वाजता जेल मधे घेतला आणि जेल चे दरवाजे उघडले.. खरं तर ते उघडण्यासाठीच त्याचा जन्म झाला होता.. देवकीचे सात पुत्र कंसाने मारल्यावर कृष्ण जन्माला येणार हे त्याला माहीत होतं कारण फक्त तोच त्याला संपवणार असतो.. अंधाराला संपवणारा एकमेव कृष्णच आहे.. कधी तो ज्ञानाने अंधार दुर करुन दाखवतो .. कधी स्वतः त्रास सहन करुन प्रकाशमय कसं व्हायचं याचं प्रशिक्षण देतो.. कधी वर्णाचे महत्व सांगुन जात धर्म काहीही नाही हे सांगतो तर कधी मैत्री कशी असावी हे स्वतः अनुभवुन दाखवतो..

कधी खट्याळपणा करत या दुखालयात आनंदी राहायला शिकवतो तर कधी बासरी वाजवून मंत्रमुग्ध करतो.. कधी झोपडीत दिसतो तर कधी महालात आणि तरीही त्या प्राजक्तासारखा दरवळतो.. कधी यशोदा मातेला मुखातून ब्रह्मांडाचे दर्शन देतो आणि सावळा रंग घेउन जन्माला येउन त्याही रंगात किती सौंदर्य आहे याचं महत्व पटवुन देतो .. आणि याच सावळ्या रंगाला काळी म्हणुन आपण हिणवतो..
कृष्ण ही कोणी व्यक्ती नसून चेतना आहे.. संपूर्ण विश्वाचे ते तेज आहे.. आपण माणूस म्हणुन त्याच्याकडे पाहिले तर तो कळणार नाही पण विश्वव्यापी अनुभव घ्यायचा असेल तर कृष्णाला जवळ करुन पहा.. त्याचा प्रत्येक गुण हा आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो.. भगवद्गीता ही कसं जगावं आणि काय करु नये हे सांगते.. त्याच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द म्हणजे प्राजक्ताचं एकेक फुल आहे.. जे वेचताना फक्त हातच सुगंधी होत नाही तर तन आणि मन दिव्यतेजाची अनुभूती घेतं.. त्याला वाचताना पटकन तो कळत नाही पण कळायला लागल्यावर तो आपल्याला सोडत नाही हा अनुभव मी घेत आहे.. आपल्या अवतीभवती तो सतत कधी मित्रांच्या रुपात तर कधी अजून कोणाच्या रुपात हातात काहीना काही घेउन द्यायला उभा असतो.. तुम्हाला कृष्णाला अनुभवायचं असेल तर प्रत्येक क्षण कृष्णमय करुन टाका कारण या व्यतिरिक्त या ब्रह्मांडात दुसरं काहीही नाही याची प्रचिती आपोआप येइल.. आजच्या या पांढऱ्या रंगाला फक्त सावळा कान्हाच न्याय देउ शकतो .. कारण शरीराचा रंग कसाही असूदेत मनाचा रंग हा पांढरा स्वच्छच असायला हवा.. पहा जमतं का त्याच्यासारखं राहायला.. सावळ्या रंगात असलेले स्वच्छ पांढरे विचार हे दुसऱ्या कोणाकडे असूच शकत नाही.. त्यामुळे आपण तेच वेचायचे आहेत..
सोच बदलो..

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *