नवरात्री स्पेशल… तिसरा दिवस ग्रे कलर… करडा रंग..

 

 

नवरात्री निमित्त आपण कृष्णाचे ९ गुण पहात आहोत.. माझा जो अभ्यास आहे आणि कृष्णावर असलेली भक्ती आणि श्रध्दा त्यामुळे तोच माझ्याकडून लिहून घेतोय आणि तुमच्यापर्यत पोचवतोय.. तुम्ही वाचक आहात म्हणुन मी आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करते.. कृष्ण अद्भुत आहे.. तो समजायला अवघड पण आणि म्हटलं तर सोप्पा ही आहे.. फक्त त्याच्या जवळ जाण्याची गरज आहे… सतत त्याच्या विचारात राहिलं की तो आपल्या समोर या लेखणीतुन प्रकट होतो.. नाहीतर त्याच्यावर लिहीण्याइतकी माझी योग्यता नक्कीच नाही.

आजचा रंग ग्रे जो मला फारसा आवडत नाही पण ग्रे शेड नक्कीच आवडते.. कारण प्रत्येक व्यक्तीमत्वाला एक ग्रे शेड असते त्याच्याकडे आपण काय ॲंगल ने पहातो त्यावरुन आपली विचाराची ताकद कळते.. जसं की एखादा ग्रे केस दिसायला लागला की आपण हवालदिल होतो .. आपल्याला वाटतं , आता आपलं सौंदर्य नष्ट होणार.. आपण म्हातारे होणार मग आपल्याकडे कोणी पहाणार नाही पण याची दुसरी बाजू म्हणजे ग्रे सोबत आपला अनुभवही वाढतो आणि खरं तर तीच बाजू आपल्याला दिसत नाही.. इथेच कृष्णाचा अजून एक गुण दिसतो तो म्हणजे विरक्ती.. सगळ्यात आनंदी रहाण्याची ही ग्रे साईड.. पण आपण विरक्त व्हायला तयारच नसतो.. माझ्या ६० वर्षाच्या मित्राची आई ज्या ८६ वर्षांच्या आहेत .. आजही त्या फक्त त्यांच्या मुलाचाच विचार करतात.. माझ्यामागे त्याचं काय होइल ??.. या विचाराने त्या आज जगणं विसरत आहेत हे त्यांना कळतच नाही.. म्हणजेच कायतर आपल्याला चार आश्रम दिलेले असूनही आपण कायम संसारातच अडकतो आणि जे साध्य करायला मनुष्य जन्मात आलोय हेच विसरतो.. पैसा , संपत्ती यात जीव अडकवुन काहीही फायदा नाही हे कृष्णाने स्वतः दाखवून दिलं.. वृंदावन गेलं, मथुरा गेलं..माता पिता गेले.. राधेला सोडून गेला .. इतकच काय तर त्याची आवडती बासरीही सोडली.. रत्नजडीत महालात राहून आणि इतकं वैभव आणि १६ सहस्त्र नारी असूनही तो सगळ्यापासून डीटॅच राहिला.. त्याने कुठल्याही गोष्टीची आसक्ती ठेवली नाही.. तो भगवंत आहे तरीही हेका ??.. तर त्याच्या भक्तांसाठी त्याने केलेल्या या लिला आहेत.. त्याला त्याच्या कृतीतुन संपूर्ण सृष्टीला विरक्ती काय असते हे दाखवून द्यायचे होते..

आजच्या या ग्रे शेडप्रमाणे आपल्याला जगता यायलाच हवं.. जेव्हा हे सगळं सुटत जाईल तितका हा माझा कृष्ण माझ्या जवळ येत जाईल हा भाव अंगिकारणं गरजेचे आहे.. आपण माणसं आहोत त्यामुळे त्याच्यासारखे सगळं सोडायला आपल्याला लगेच जमणार नाही पण प्रयत्न केला तर सगळं उपभोगुन झाल्यावर आपण हळूहळू यातून बाहेर पडून भक्तीला नक्कीच लागू शकतो.. कुठलीही गोष्ट जितकी अवघड तितकी तिची शक्यता जास्त .. इच्छा आणि त्याच्यावर विश्वास असेल तर ठरावीक वयानंतर आपण यातून बाहेर पडुन या दगडी रंगाचा उत्तम आस्वाद घेउच शकतो.. माझ्या वाचकांची कृतज्ञता व्यक्त करते आणि भगवंताचीही कारण मला खुप लवकर त्याने भक्तीचं महत्व पटवुन घ्यायला भाग पाडलं आणि शब्दरुपात त्याला उलगडताना भावनांना बांधताना नक्कीच या लेखणीत तो आहे हे प्रकर्षाने जाणवते.. सगळं त्याचच आहे.. त्याचीच निर्मिती आहे मग सतत त्याच्या नामात राहायला आपल्याला ग्रे शेड ची सुध्दा वाट पहायची गरज नाही.. ग्रे शेडमद्गे अनेक रंग भरुन आपलं आयुष्य कृष्णासारखं कलरफुल बनवूया आणि त्या रंगात सगळ्याना सामावून घेउयात..

आमचे सरश्री ( Happy Thoughts ) त्यांचा कृष्णावर प्रचंड अभ्यास आहे.. ते ज्या पध्दतीने कृष्णावर बोलतात ना असं वाटतं , तोच त्यांच्या मुखातून बोलत आहे.. यु ट्युब वर त्यांना ऐका आणि त्याचं यावर एक भजन आहे तेही रोज ऐका..
जाने दो सबकुछ जाने दो..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *