अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा केला जातो.आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रोत्सव होय. नवरात्रामध्ये देवीची नऊ रुपे सांगितलेले आहेत.1) शैलपुत्री 2) ब्राह्मचारिणी 3)चंद्रघंटा 4)कुष्मांडा
5) स्कंदमाता 6)कांत्यायनी 7) काल रात्री 8) सिद्धियात्री 9) महागौरी
अशा नऊ रूपाची पुरातन काळा पासून संपूर्ण जगभरात पूजा केली जाते.पहिल्या तीन दिवसात दुर्गा मातेची, पुढील तीन दिवसात महालक्ष्मीदेवीची व पुढील तीन दिवसात सरस्वती देवीची भक्तगण मनोभावे पूजा करतात. या लेखात आपण नवरात्रीत सात्विक नऊ गुणांची घुसळण करणार आहोत. तमो,रजो या गुणापासून दूर जाऊन सात्त्विक नऊ गुणाचा येथे जागर घालणार आहोत. ती पुढील प्रमाणे आहेत 1) परोपकार : मनुष्याने जीवन जगते वेळेस नेहमी परोपकार वृती अंगी बाळगावी,त्यामुळे इतरांवर परोपकार केल्यानंतर ते आपणाला कधीही विसरू शकत नाहीत. या गुणांमुळे इतरांना फायदा होतो.व समाज स्वास्थ्य चांगले चालते.
2) दान: ज्या व्यक्तींना खरोखर दानाची आवश्यकता आहे, त्या व्यक्तीला दान द्यावे.त्यामुळे अनेक लोकांचा फायदा होऊन त्यांचे जीवन चरितार्थ मजबूत बनते.3) समाधान: ठेविले अनंते तैशीची राहावे।चित्त असू द्यावे समाधानी।।असे संत तुकाराम महाराज म्हणतात. कारण समाधानात सर्व काही मिळते.4) देवभक्ती: प्रत्येक व्यक्तीने मनाभावापासून देवाची सेवा करावी..त्याच्यावर निष्ठा ठेवावी.मनाचे असंतुलन होऊ देऊ नये. यालाच देवभक्ती म्हणतात. 5) उत्साह: उत्साही माणसे नेहमी आपल्या जीवनात यशस्वी होतात.आळशी माणसे पाठीमागे राहतात. म्हणून मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।। असे म्हटले जाते. त्यासाठी उत्साही व्यक्तिमत्व असावे. 6) विवेक: विवेक म्हणजे बुद्धी, माणसाने विवेकाचा जागर करावा,आपल्या अंगी असणाऱ्या विवेकाने संपूर्ण जग काबीज करावे. नाहीतर कमीत कमी लोकांचा तरी फायदा करावा.7) वासना : मानवी जीवन जगत असताना त्यांनी क्रोधावर तसेच वासनेवर सुद्धा विजय मिळवावा नाही तर आपण रसातळाला जातो. 8) मन: आपले मन नेहमी आपल्या ताब्यात असावे. मन वढाय वढाय..मन जिंकेल तो जग जिंकेल. मनावर ताबा मिळणार्या व्यक्तींनी मोठ-मोठे विजय प्राप्त केले आहेत.
9) आहार: माणसाने नेहमी सात्विक आहार घ्यावा.त्यामुळे मन शुद्ध राहते, चित्त प्रसन्न राहते.गर्भवती महिलांनी सात्विक आहार घ्यावा.
याशिवाय जीवन जगते वेळेस चांगुलपणा, सकारात्मकता, निर्मळपणा,मानवी संतुलन, चांगुलपणा या गोष्टीही शिकाव्यात. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव गावोगावी, खेडोपाडी, घरोघरी चालू आहे.
नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व फार आहे. सात्त्विक, सज्जन व्यक्तीची फसवणूक करून जगात जेव्हा जेव्हा तामसी ,राक्षसी,नराधमाची,प्रबळ लोकांची,असुरांची संख्या वाढते, तेव्हा माता दुर्गा हातात त्रिसूळ घेऊन यांचा संहार करते. आजकाल अनेक ठिकाणी महिलांना त्रास दिला जात आहे.आजच्या काळात स्त्री सक्षमीकरण झाले पाहिजे.तिच्याकडे वाईट नजर करणाऱ्या व्यक्तींना कडक शिक्षा दिल्या पाहिजेत.
आज स्त्री ही निर्भर झाली पाहिजे. तिचा आत्मसन्मान वाढविला पाहिजे. अजूनही समाजामध्ये लैंगिक शोषण होत आहेत.दररोज कुठेतरी महिलावर अन्याय,अत्याचार घडत आहेत
.महिला सध्या अनेक ठिकाणी दबावाखाली काम करताना दिसून येत आहेत.त्यांना सर्वांनी मोकळेपणाने कसे जगता येईल याकडे लक्ष द्यावे. अनेका ठिकाणी महिलांना सन्मान देऊन चांगले सुद्धा वागविण्यात येत आहेत.हे सांगितले पाहिजे. नवरात्रात नऊ दिवसात नऊ महिलांचे कीर्तन ठेवले जात आहेत. हरितालिकेच्या दिवशी स्नुषाची (सुनाची) काही ठिकाणी पूजा केली जात आहे.समाज हळूहळू आधुनिकतिकडे जात आहे. याची टक्केवारी बोटावर मोजणी इतकी आहे.महिलांना सुरक्षा द्या.त्यांचा सन्मान करा.नवरात्री मधून आई अंबाबाई,भवानी, रेणुका,
महालक्ष्मी यांचा जसा सन्मान केला जातो, तसाच माता-भगिनीचाही सन्मान प्रत्येक घराघरात व्हावा. देवीनी सर्व भक्तांना भरभरून आशीर्वाद द्यावा.जगात देवीची 108 शक्तिपीठे आहेत,महिलावर अन्याय होऊ नये म्हणून नऊ सात्वीक गुणांचा जागर घालत आहोत.आज परिस्थिती बदलली प्रत्येक गल्लीबोळामध्ये नवरात्र उत्सवात धांगडधिंगा,अश्लील गाणे डीजेवर लावले जात आहेत. यामधून विकृतीकडे समाज चालला आहे.फॅशनच्या नावाखाली महिलांची ही इभ्रत जात आहे. गरबा आणि दांडिया मधून निर्मळ मनोरंजन व्हावे हा हेतू आहे .नाच आणि नृत्य यामध्ये बराच फरक आहे. देवाने नृत्य केले नाच केला नाही. उदाहरणार्थ तांडव नृत्य ,फुगडी देवाने खेळली. याचा अर्थ असा नाही की धांगडधिंगा घालून मन आकर्षण करणे या गोष्टीचा वर्ज्य आहेत.नवरात्रातून चांगले विचार मोती वेचून घेऊन त्याची माळ करून देवीला अर्पण करा. अंबा मातेची नऊ रुपे तुम्हाला कीर्ती,प्रसिद्धी, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, आणि शांती देवो. माता दुर्गेची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. देवीच्या चरणी प्रार्थना करतो.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*