वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश* भाग 26वा

 

निळ्या तळ्यात ढवळ्या बगळ्यांनी
भीम मासा हो घेतला गिळूनी
बुद्ध तत्वाच्या बोधी खेकड्याने
मान बगळ्यांची धरली आवळूनी!!!

माझ्या लहनपणी माझे मोठे बंधू विठ्ठलराव गायकवाड हे गीत गात असत…
त्यावेळी या गीताचा अर्थ काही समजत नव्हता. पण ही कथा मात्र माझी माय सांगायची… *एका तळ्याकाठी एक बगळा होता.तो तळ्यातील मासे खाण्यासाठी टपून बसलेला असायचा पण त्या तळ्यातील मासे ही चाणक्ष होते. ते काही बगळ्याच्या तावडीत सापडत नसत.बगळा अनेक क्लुप्त्या वापरून पहिल्या पण काही उपयोग झाला नाही. मग त्याने शेवटची युक्ती वापरली. साधूचे सोंग घेऊन एका पायावर उभा राहून जप करू लागला…. पाणी, पाणी, पाणी….. एका मासळीच्या पिल्याने हे पहिले आणि म्हणाले, बाबा, या तळ्यात इतके पाणी असताना तुम्ही पाणी पाणी का म्हणता? बगळा धूर्तपणे म्हणाला, बाळा या तळ्याचे पाणी लवकरच आटणार आहे. येथील सारे जीव जंतू तडफडून तडफडून मरणार आहेत. म्हणून मी इथे आलोय. तुमच्या भल्यासाठी. तू जाऊन सांग सर्वांना.. बाजूच्या तळ्यात भरपूर पाणी आहे. मी सर्वांना तेथे सोडणार आहे.* बिचारे मासे त्या धूर्त बगळ्याच्या बोलण्यावरून विश्वास ठेऊन निघाले. मग बगळ्याने एका एकाला चोचीत धरून माळावर नेऊ लागला आणि मस्त ताव मारु लागला… एक दिवस सारे मासे संपले. तळ्यात फक्त एक खेकडा शिल्लक राहिला बगळा त्या खेकड्याला चोचीत पकडण्याचा प्रयत्न करू लागताच खेकड्याने बगळ्याची मान आपल्या लांगीने कर्कचून आवळली…..

1957 ला राष्ट्रीय पक्ष असलेला RPI 197-72 पर्यंत प्रभाव हीन झाला. सगळेच पुढारी काँग्रेस च्या गळाला लागले
पोटरीत असलेली कणसे काँग्रेस च्या या गाय वासराने चघळून चघळून खाल्ली.
सारं कुरण उजाड, ओसाड झाले.यावर
वामन दादांनी लिहिलं
वाळूनी चालला हा उभा जोंधळा
कोण रखील माझ्या भीमाचा मळा?

अंतःकरण पिळवटून टाकणारे हे गीत प्रत्येक आंबेडकर अनुयायाचे आत्मतेज जागवणारे ठरले. याच समायास 1980 ला
ऍड.बाळासाहेब आंबेडकर नावाच्या ताऱ्याचा आंबेडकरी चळवळीच्या क्षितिजावर उदय झाला. कुरणाला वाली मिळाला. काँग्रेस चे गाय वासरू त्यांनी आंबेडकरी कुरणातून हुसकावून लावले. आपल्या कुरणाला कुंपण घातले. वाहून जाणाऱ्या पाण्याला बांध घालून अडविले.पुन्हा नव्याने मशागत सुरु केली. विचाराची पेरणी करून प्रयत्नाचे पाणी शिंपडले. पुन्हा कुरण बहरू लागले.भरकटलेली पाखरे पुन्हा हक्काच्या कुरणात विसाऊ लागली … तिकडे काँग्रेसच्या मळ्याला मात्र उतरती काळा लागली. जुनाट वृक्ष उन्मळून पडली. नव्या वृक्षाला बाहरच येईना. कारण पाण्याचा पाटच अडविला गेल्यामुळे काँग्रेस चा मळा सुकून जाऊ लागला. मळ्याची अवकळा पाहून बेचैन झालेल्या काँग्रेस पुढऱ्यांच्या लक्षात आले की पाणी कोणी अडविलेले आहे….?
पुन्हा काँग्रेसी मळा फुलवायचा असेल तर अडविलेला बांध फोडावा लागेल… त्यासाठी काही तळे राखी हाताशी धरावे लागतील आणि त्यांच्याच हातांने बांध फोडावा लागेल…….
कारण 1984 पर्यंत एक हाती असलेली सत्ता आंबेडकर वाद्याच्या लोकजागृतीमुळे अनेकदा काँग्रेस च्या हातातून हिसकावून घेतली जाऊ लागली.

इच्छा नसतानाही नाईलाजाने सत्तेत अनेकांना भागीदार करून घ्यावे लागले.हे शल्य काँग्रेस जणांना आतून कुर्तडत आहे…. त्यामुळे आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्यासाठी टपून बसलेल्या काँग्रेस ने ठरविलेले आहे, बोलून दाखविलेले आहे की आंबेडकरांचा बालेकिल्ला आंबेडकर वाद्याच्याच हाताने उध्वस्त करू… ते कामालालागले ही पोटभरू विचारवंत गँग त्यांना आयती मिळाली.वंचितांच्या विरुद्ध या गँग ने आघाडी उघडली अनेकांना जबाबदारी देण्यात अली आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होऊन आपल्याच मुळावर घाव घालायला लागलेत. राजगृहामुळे शिक्षण मिळाले,इज्जत मिळाली नोकरी मिळाली, पैसा मिळाला..
त्या राजगृहाशी उघड उघड द्रोह करून संविधान, संविधान, संविधान असा जप सर्व काँग्रेस वाले करू लागले…..
.पुस्तकाच्या पाना पानावर रडगाणे गाऊन ज्यांनी माया जमविली , सहानुभूती मिळावीली मोठे झाले. मानसन्मान, पुरस्कार मिळू लागले आणि हे हरभऱ्याच्या झाडावर चढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मचरित्र लिहून रडगाणे सांगत बसले नाहीत. बरं यांचे विद्वत्ताप्रचूर ग्रंथ कोण वाचतं. एका तरी काँग्रेस वाल्यांच्या खाजगी लायबररीत यांचं एखाद पुस्तक दाखवा. यांची विदवत्ता आमच्याच गल्लीत. हे फार विद्वान आहेत म्हणून तिकडे एखाद्या कार्यक्रमात यांचे व्याख्यान झाले असे कधी झाले का? यांनी बोलावं आमच्याच गल्लीत दुसऱ्या गल्लीत गेले तर यांना फाडून खाल्ले असते. हे विचाराचे वारसदार रक्ताच्या वरसदाराची टिंगल टवाळी करतात. मग यांनी तरी काही दिवा लावायचा होता. यांना विचार कळले होते ना? विचार कळून काय लोणचे घातले का विचाराचे?

चीन चा कम्युनिष्ठ पक्ष स्थापन झाला तो एका सरोवराच्या मध्यभागी एका नावेत. चीन मध्ये सम्यवाद फलफूलणार नाही असे रशियन साम्यवाद्यांना वाटे पण माओ ने 1949 ला सारी सत्ता हाती घेतली . Red star over the chaina म्हणून माओ जगप्रसिद्ध झाला. असी काही विचार क्रांती या विचाराच्या वारसदारांनी केले नाही उलट रक्ताच्या वारसदाराने मोठ्या मेहनतीने उभारलेले घरटे मोडीत काढण्यासाठी शत्रू पक्षात सामील झाले हा यांचा फार मोठा अपराध आहे…… या अपराधात
अपराधी स्त्री आहे का पुरुष हे महत्वाचे नसून त्यांनी अपराध केला हे महत्वाचे आहे. अपराधी पुरुष आहे म्हणून वेगळा न्याय आणि अपराधी स्त्री आहे म्हणून वेगळा न्याय असा प्रश्न नाही अपराधी अपराधी आहे हे महत्वाचे….एखादी चोरी आहे ती पुरुषांनी केली तर चोरी आणि महिलांनी केली तर चोरी होत नाही का ? चोरी बेधडक करायची आणि पकडल्यावर म्हणायचे मी स्त्री आहे म्हणून पोलिसांनी मला सोडून द्यावं……

विचारवंत मंडळींनी थेट एखाद्या पक्षात प्रवेश न करता अमुक एका पक्षाची हुजरेगिरी केली,दलाली केली. त्यांनी सरळ त्या पक्षात प्रवेश केला असता आणि मत मागितले असते तर संयुक्तिक वाटले असते…. पण घरचे खाऊन मामाच्या शेळ्या राखायची दुर्बुद्धी कशी काय सुचली? कोणाच्या ईशाऱ्यावर हे तुम्ही केलं?
काही विचारावंत म्हणाले की आम्ही समाजासाठी आयुष्य खर्ची घातले. मी म्हटलं,
पॉकेट घेऊन?
बुद्ध जिथे देसना देत तिथे दान घेत नसत. तुकोबा जिथे कीर्तन करीत तिथे पाणी ही घेत नसत. आमचे विचारवंत पॉकेट घेतल्याशिवाय स्टेजवर चढत नाहीत.
मोले घातले रडाया
नाही असू नाही माया
2002 साली माझ्या पुस्तकाच्या प्रकाशना साठी मी एका विचारवंतास निमंत्रित केलं होत. ते म्हणाले मी बस ने येत नाही कार पाठव. मी कार पाठवून दिली. सायंकाळी 7 वाजताचा कार्यक्रम होता. सहा वाजता कार त्यांच्या घरापुढे उभी केली. सात वाजत आले तरी साहेब काही बाहेर येत नाहीत. मॅडम म्हणाल्या ते लावून पडले आता उठत नाहीत. तुम्ही जा.
गाडी रिकामी अली. एक हजाराचे भाडे फुकट गेले…..

एक विचारवंत म्हणाले तुमचा प्रकाश आंबेडकर OBC, OBC करत फिरतो आणि obc वाल्यांनीच खैरलांजी कांड घडविले…..
खैरलांजी कांड हे अतिशय क्रूर, पाशवी, मानव जातीला कलंक लावणारे कांड घडले. घडवीणारे obc होते हे खरे आहे. पण गुन्हेगाराला जात नसते. एखाद्यावरून संबंध समुहाला जबाबदार धरता येत नाही… पण या सर्व गुन्हेगाराची पाठराखण काँग्रेसवाल्यांनीच केली.आम्हाला नक्सल वादी काँग्रेसवालेच म्हणाले.. गुन्हेगार कसे सुटतील याची तजवीज केली. खैरलांजीला तंटामुक्त गाव पुरस्कार काँग्रेस नेच दिला.काँग्रेस चे हात हे दलितांच्या रक्ताने मखलेले असताना हे म्हणतात काँग्रेस आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. काँग्रेस मुळे तुमचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले. काँग्रेस ने आरक्षण दिले म्हणून तुम्ही शिक्षण घेऊ शकलात नोकऱ्या मिळाल्या. वंचिवाल्यांनी काँग्रेस चे उपकार मानायला पाहिजे.. वगैरे वगैरे… यांच्या भिकारचोट वृत्ती ची कीव येते.बरं यांच्या आयुष्याच्या मेहनतीची
एखादी उपलब्धी सांगा?यांची साहित्यिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काय उपलब्धी आहे? पॅकेट घेऊन भाषण झोडणारे पाकीटमार काय उपलब्धी सांगणार? आयुष्यात एक ही रुपया न घेता भाषण दिलं असं एकातरी विचारवंताने छाती ठोक सांगावे. यांची भासणे ऐकत कोण? तिकडे काँग्रेस च्या स्टेज वर जाऊन एखाद भाषण द्या म्हणावं बरं. ऐकतात का यांचं भाषण. यांची भाषण ऐकावी आम्ही. यांना पॅकेट द्यावे आम्ही. यांना कोंबडी खाऊ घालावी आम्ही.आणि सारं काही आमचं घेऊन यांनी दलाली करावी ती काँग्रेसची?…
यांच्या शोधप्रबंधावर एखादा प्रोजेक्ट उभा राहिला? एखादी समाजहीतकरक लोकचळवळ उभी राहिली? एखादी अजरामर कलाकृती निर्माण झाली? आमच्या समाजातील महिलांची सर्वात जास्त बेइज्जत आमच्या साहित्यिकांनी केलेली आहे. अन्याय अत्याचारावर केवळ पुस्तक लिहून न्याय मिळत नसतो तर अन्यायाविरुद्ध लढा उभारून न्याय मिळवावा लागतो. यातील काही तळे राखी काँग्रेस ने हेरले, पेरले आणि कामाला लावले. या तळे राख्यांची तहान भागली होती. बाकीच्यांचे काही का होईना आपली झोळी भरली पाहिजे या स्वार्थी वृत्तीने हे तळे राखी फितूर झाले

त्यांनी बांधफोडण्याची कुचेष्टा केली. लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर जनाक्रोश फितूरांच्या घरापर्यंत पोचला. तेव्हा ते म्हणतात एक स्त्री म्हणून त्यांनी आमचा विचार केला नाही. जे जे अपराधी आहेत त्यांना लोकांनी जाब विचारला तर बिघडले कुठे?. *जैशी करणी वैशी भरणी* *
अनेकांना गिळनंकृत करणाऱ्या काँग्रेसी बगळ्याची मान आता बाळासाहेब आंबेडकरांनी आवळून धरलेली आहे त्यामुळे त्यांची फडफड फडफड फडफड चालू आहे….

 

 

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *