मुखेड: (दादाराव आगलावे)
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्णिंत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गोवर्धनशेठ बियाणी, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी हरिहर धुतमल यांच्या मार्गदर्शनखाली, जिल्हा संघटक ॲड. संदीप कामशेट्टे आणि ज्येष्ठ पत्रकार यशवंत बोडके, दादाराव आगलावे, ॲड.आशिष कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत सदस्या मधून जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. अध्यक्षपदी महेताब शेख,
सचिवपदी राजेश बंडे,
सल्लागारपदी यशवंत बोडके, ॲड. संदीप कामशेट्टे, दादाराव आगलावे, ॲड.आशिष कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी नामदेव श्रीमंगले, उपाध्यक्षपदी दत्तात्रय कांबळे, उपाध्यक्षपदी रामदास पाटील, संघटकपदी संजय कांबळे, कोषाध्यक्षपदी जगदीश जोगदंड, कार्यकारणी सदस्यपदी जैनोदीन पटेल, विठ्ठल पाटील येवतीकर, राजु रोडगे आदींची निवड करण्यात आली.नूतन कार्यकारिणीचे आमदार डॉ. तुषार राठोड, माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड, बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील आंबुलगेकर, खुशालराव पाटील उमरदरीकर, सुभाष पाटील दापकेकर, संतोष बोनलेवाड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, विजय जोशी, अनिल कसबे, चारुदत्त चौधरी, हरिहर धुतमल, राम तरटे, आदिंनी अभिनंदन केले आहे.