नांदेड : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चैतन्यबापू देशमुख, संतोष पांडागळे आणि निलेश देशमुख बारडकर यांच्यावर जिल्हा प्रवक्ते पदाची धुरा सोपवली आहे.आ. बावनकुळे यांनीच याबाबत पत्र जारी केले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय महत्वाचा आहे. हे तीनही प्रवक्ते मिडिया व सोशल मीडियावर पक्षाची बाजू मांडणार आहेत. चैतन्यबापू देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांना संघटनेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. संतोष पांडागळे यांचाही प्रवक्ते म्हणून प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. निलेश देशमुख बारडकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे पदाधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहेत.
या तीनही प्रवक्त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्हा असणार आहे. या नियुक्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शिफारस केली होती. त्यांच्या हस्ते आज नवनियुक्त प्रवक्त्यांनी आपले नियुक्तीपत्र स्वीकारले. या तिघांचेही सर्वत्र अभिनंदन होते आहे.