वाचन: एक दीपस्तंभ* वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर

प्रत्येक कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीने स्वतः हातात पुस्तक घेऊन वाचन करावे.तेव्हा घरातील छोटे मुले आपल्याजवळ बसून अभ्यास करतील, तेव्हाच वाचन संस्कृतीची जोपासना होईल.वडीलधारी व्यक्ती जर हातात मोबाईल घेऊन तासनतास खेळत बसले. आणि मुलांना वाचन करा? असे सांगून महावाचन चळवळ यशस्वी होणार नाही. त्यासाठी समाजातील सर्वच व्यक्तींनी पुढाकार घेऊन चावडीवर,मंदिरात, शाळेत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वाचन कट्टे तयार करावे लागतील.फक्त बोलून काहीही फरक पडणार नाही. वाचनासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गाव, वस्ती, पाडा या ठिकाणी वाचनालये असावेत, प्रत्येक ठिकाणी पेपर मराठी, हिंदी, इंग्रजी, साप्ताहिक,नियतकालिके, मासिके, पाक्षिके, आध्यात्मिक पुस्तके ,कथा, कादंबऱ्या ,स्पर्धा परीक्षेचे पुस्तके, आधुनिक काळात उपयोगी असणारे पुस्तके या सर्वांचा ग्रंथालयात गावातल्या वाचनालयात समावेश असावा.तेव्हा महाराष्ट्र शासनाने चालवलेली ही अतिशय सुंदर अशी महावाचन चळवळ यशस्वी होईल,

डॉ. ए,पी,जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत.वाचाल तर वाचाल असे आपण ऐकलेले आहे.बालपणापासून वाचन केल्यामुळे बुद्धी प्रगल्भ होते. पुस्तके वाचल्यामुळे मस्तक सशक्त होते. वाचनाची सवय लावा. आयुष्यात सुख म्हणजे काय ते तुम्हाला कळेल.भारतातील अनेक मोठमोठे व्यक्ती ग्रंथ वाचूनच मोठे झालेले आहेत. एका ठिकाणी लोकमान्य टिळक म्हणतात” मी नरकात सुद्धा उत्तम पुस्तकाचे स्वागत करील.नरका मध्ये पुस्तकाच्या साथीने स्वर्ग निर्माण करेल. कारण पुस्तकांचे सामर्थ्य मी जाणतो” अशा पद्धतीनं पुस्तकाबद्दल गौरवोद्गार त्याने काढलेले आहेत. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सी व्ही रामन, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या थोर व्यक्तिमत्त्वांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले आहे.त्यांच्या जडणघडणी मध्ये ग्रंथ वाचनाला मोलाचे स्थान दिलेले आहे. म्हणून वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. वाचन केल्यामुळे ज्ञानात भर होते.
वाचनामुळे शिक्षण चांगले मिळते.

मन विशाल होते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात.”प्रसंगी अखंडित वाचीत जावे”म्हणून वाचन महत्त्वाचे आहे.भवसागरात हेलकावे खाणाऱ्या माणसाला इच्छित स्थळी नेणारे जहाज म्हणजे ग्रंथ होय. तसेच वाचन हे एक व्यसन आहे ते एक बार लागल्यानंतर तुम्ही वाचतच राहणार. संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या रूपाने तुकाराम गाथा लिहिली. त्यामुळे आज करोडो लोक तुकाराम गाथेवर चिंतन मनन करत आहेत. त्यांचा अभ्यास करत आहेत.
उत्तम वाचक व्हायचे असेल तर तुम्ही पुस्तक वाचन करत चला.
घरातील समस्या कटकटी दूर करायच्या असतील तर तुम्ही पुस्तक वाचून डोकं शांत ठेवा.ग्रंथ नष्ट झाले तरीही त्यातील विचार नष्ट होत नाहीत.म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. संत निवृत्तीनाथांना पसायदान मागितले, वाचनाची शक्ती फार मोठी आहे. भारतातील सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी आणून ओतली तरी मी बालपणापासून जडलेले वाचनाचे प्रेम सोडून देणार नाही असे ख्यातनाम इतिहासकार गीबन एका ठिकाणी म्हणतात. समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मी वनवासी, कुलगुरू नरेंद्र जाधव यांचे मी आणि आमचा बाप ,पूज्य साने गुरुजीचे श्यामची आई ,विश्वासराव नांगरे पाटील यांचे मन मे है विश्वास, शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण साहित्य फकीरा कादंबरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताचे संविधान. छत्रपती संभाजी महाराज यांचे बुद्धभूषण, संत एकनाथ महाराजांचे भावार्थ दीपिका, महाकाव्य महाभारत आणि रामायण असे कितीतरी महान ग्रंथ आज आपल्याला दिशादर्शक आहेत. त्यासाठी वाचन हे एक दीपस्तंभ आहे म्हणून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे.
ग्रंथ हा असा शिक्षक आहे की तो गुरुदक्षिणा मागत नाही. हेही आता तरुण पिढीने लक्षात घ्यावे.
तो कधीही कोणावर ओरडत नाही. रुसत नाही, कोणाला भीती दाखवत नाही, म्हणूनच ग्रंथाला गुरु म्हणतात. ग्रंथ वाचन करा. आणि मोठ्या पदव्या तुम्ही काबीज करा.वाचनालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचे ज्ञान वाढवावे. डॉ. ए,पी जे अब्दुल कलाम हे भारतातील महान शास्त्रज्ञ, कर्तव्य दक्ष राष्ट्रपती, मिसाईल मॅन अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. त्यांचे अग्निपंख आत्मचरित्र वाचावे. जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन .
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव* संस्थापक: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *