मराठी भाषेची उत्तम जाण,अस्खलित पणे मराठी भाष्य करणे, उत्तम व स्पष्ट मराठी शब्दोच्चार ते करीत असत. सामाजिक जाणीव व भान असलेले, तसेच दुसऱ्याचे मन जाणणारे, सर्वांसोबत राहणारे,
नम्रता,नैतिकता,सचोटी, प्रमाणिकपणा,वक्तशीरपणा,या गुणांनी परिपूर्ण असलेले सदैव हसरे व्यक्तिमत्व म्हणजेच अभिनेता अतुल परचुरें होय.संपूर्ण देशभर ज्यांच्या नावाचा गाजावाजा होता.असे विनोदी व सुसंस्कृत व्यक्तीमत्व सर्वांना खळखळून हसवणारे,दुसऱ्याचे दुःख आपले समजणारे अतुलनीय कार्य करणारे अतुलजी आज 57 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात हा आढावा…अतुल परचुरे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. लहानपणापासूनच विनोदी बुद्धी असल्यामुळे अनेक जणाला हवेहवसे वाटणार हे व्यक्तिमत्व फुलत गेले. त्यांचे शिक्षण मुंबई येथेच झाले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अभिनयाची झालर बसली, बजरबट् या नाटकात बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय केले.तिथून ते अभिनय क्षेत्रामध्ये आले.नाटक,मालिका, चित्रपट यामध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला.माणूस आणि उत्तम व्यक्ती म्हणून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगले मित्र मिळवले होते.आज ते लाखो लोकांचे चाहते असून मराठीतील,नातीगोती,नवरा माझा नवसाचा,पार्टनर,ऑल द बेस्ट,खट्टा मीठा,तसेच हिंदी चित्रपटा तून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या पत्नी सोनियांनी त्यांना शेवट पर्यंत मोलाची साथ दिली.खरोखर कलाकार काय असतो.
हे त्यांच्या अभिनयातून शिकावे.
कलेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आयुष्यभर हसविले. परखडपणा त्यांच्याकडे होता. विनोदी भूमिका त्यांनी केल्या. जनजागृती करून लोकांमध्ये प्रबोधनाचा जागर केला, वासूची सासू्,माधव गेला कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रियतमा, तूजं आहे तुजपाशी, व्यक्ती आणि वल्ली या नाटकातून त्यांनी कसदार अभिनय केला. छोट्या पडद्यावर अनेक दशके गाजवली. होणार सुन मी या घरची, माझी होशील ना, या विनोदी मालिका मधून त्यांनी चांगल्या भूमिका वठविल्या. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची त्यांच्या समोर हुबेहूब भूमिका करून दाखवली.
ते खरोखर आश्चर्यचकित झाले. तसेच खिचडी या चित्रपटातून अशोक सराफची भूमिका ही त्यांनी केली होती. त्यामुळे माणसे जोडणारे व्यक्तिमत्व म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जाते
.एक जिंदादिल व्यक्तिमत्व त्यांचे होते. त्यांच्या सभोवताली नेहमी मित्रांचा गोतावळा असे. सर्वांना ते आपले वाटायचे. फिर भी दिल है हिंदुस्तानी, मधून ही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.त्यामुळे ते अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांना धावपळीच्या जीवनात यकृताचा कॅन्सर हा आजार झाल्या मुळे त्यांनी परदेशात जाऊन त्यावर उपाय केले. त्यावर सुद्धा त्यांनी मात केली होती. ‘जागो मोहन प्यारे’ ही टीव्ही वरील मालिका खूप गाजली. वरील सर्व त्यांचे कार्य पाहून एक वेळेस सिने चित्रपट सृष्टीतील सर्व ज्येष्ठ कलाकारांनी त्यांना सलामी सुद्धा दिली होती.अलीबाबा आणि चाळीशीतील चोर हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता, परंतु त्यांनी अलीकडे सूर्याची पिल्ले या अजरामर नाटकां मध्ये ही त्यांचे नाव होते. कपील शर्मा शो व टीव्हीवरील अनेक मालिकेतील कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करत होते. कॉमेडी शो तसेच ते जाहिराती सुद्धा अतिशय दिलखेचकपणे करायचे. जाहिरातीत कुरकुरे आणि परचुरे यांचे नाते फार जवळचं होते. शेवटी 14 ऑक्टोबर रोजी ते सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले.
परंतु त्यांच्या मित्रांना,नातेवाईकांना फार मोठा दगा देऊन ते गेले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे यांनी चांगला मित्र गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.अशा या हरहुन्नरी ज्येष्ठ कलाकारास विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेडच्या वतीने विनम्र अभिवादन.
शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड