वाचन प्रेरणा दिनानिमित्त कागणे कोचिंग क्लासेस कंधार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

 

*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन हे एक प्रेरणादायी आहे. त्यांच्या जिद्द, कष्ट, आणि समाजाच्या प्रति असलेल्या प्रेमामुळे त्यांनी भारतीय तरुणांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. “जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, सतत शिकत राहा आणि कठोर परिश्रम करा.” त्यांचे विचार आणि कार्य प्रत्येक विद्यार्थ्याला, नागरिकाला आणि देशप्रेमीला पुढे जाण्याची प्रेरणा देतात अशी त्याची दूरदृष्टी होती.

१५ ऑक्टोबर हा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपल्या देशात आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ कागणे कोचिंग क्लासेस मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी राष्ट्रीय स्तरावरील शालेय विद्यार्थ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एन.एम.एन.एस परिक्षेत पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सोबत श्रेया इंटेलिजेंट या परीक्षेतील विद्यार्थ्यांचा ट्रॉफी ,मेडल ,प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री गणेश उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या केसिसी टॅलेंट सर्च परीक्षा (एम सी क्यू) परीक्षेचा निकाल जाहीर करून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
तालुक्यातील नामवंत डॉ. ज्ञानेश्वर केंद्रे एमबीबीएस एमडी, तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात युवकाचे नोकरीचे स्वप्न साकार करणाऱ्या मुंडे करिअर अकॅडमी चे संचालक वाय टी मुंडे आणि गणपतराव मोरे विद्यालय कंधार चे माजी मुख्याध्यापक भगवानराव कंधारे यांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली कागणे कोचिंग क्लासेस मार्फत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एन.एस परिक्षेत पात्र गुणवंत विद्यार्थी – रोहन मुसळे ,मानसी बिजले ,प्रवीण केंद्रे ,हाजी शेख ,करण गुट्टे, कांचन मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच श्रेया इंटेलिजेंट या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी – रोहन मुसळे ,ओमकार बंदुके , मानसी बिजले, शेख हाजी, केंद्रे प्रवीण ,वाघमारे मनोज, मुंडे ममता , समर्थ केंद्रे ,मुंडे विष्णू, शिंदे जिज्ञेश, पवळे सृष्टी ,भागवत मुसळे ,स्नेहल गीते, युवराज कागणे ,साईराज जायभाये, तंन्जा शेख , बसवंते ऋषिकेश,स्वाती कंधारे यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या प्रभावी वक्तृत्वातून वाय टी मुंडे सर यांनी विद्यार्थांना स्पर्धा परिक्षेविषयी सखोल असे मार्गदर्शन केले . तर डॉक्टर ज्ञानेश्वर केंद्रे व भगवान कंधारे यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले.यावेळी सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले प्रस्तावना माधव गोटमवाड यांनी मांडली तर आभार परमेश्वर कागणे यांनी मानले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कागणे कोचिंग क्लासेस चे संचालक परमेश्वर कागणे, विकास चव्हाण, बेग सर, गावंडे सर , कागणे मॅडम, माधव गोटमवाड ,संतोष कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *