मुखेड: प्रतिनिधी
तालुक्यातील वर्ताळा येथील रहिवासी ह.भ.प. व्यंकटराव नागोराव डावकरे यांचे -हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वर्ताळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यंकटराव डावकरे हे मागील अनेक वर्षापासून धार्मिक ग्रंथ वाचक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वास्तु बांधकामात वेगळाच ठसा त्यांनी उमटविला होता. अचानकपणे रात्री अकराच्या सुमारास छातीमध्ये दुखापत होत असल्याची जाणीव झाली व ते जागेवरच कोसळले व त्यात त्यांची प्राणज्योत मावळली.
मृत्युसमयी ते ७४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रामदास व हरीराम डावकरे यांचे ते वडील होत. व्यंकटराव डावकरे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात एक पोकळी निर्माण झाली अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.