धर्मापुरी ( प्रतिनिधी ) चमकायचं असेल तर अगोदर तळपावं लागतं असं प्रतिपादन प्रा डॉ देशमुख पी डी यांनी केले. ते येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 15 आक्टों 24 रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वाचनपीठावर प्राचार्य डॉ होळंबे टी एल अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एक मिनिट स्तब्ध उभे राहून दिवंगत मराठी अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुढं बोलताना त्यांनी मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या यांच्या जीवनातील ठळक घटना सांगून वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. यावेळी प्रा मुंडे एस जी यांनी पण त्यांच्या जीवनावर यथोचित प्रकाश टाकला.
प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन प्रा भगवान आमलापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय दराडे जी एस, प्रा मोमले आर जी आणि कासिम शेख यांनी परिश्रम घेतले. अध्यक्षीय भाषणाने वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रमाची सांगता झाली.