नांदेड;
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेची नांदेड जिल्हा शाखेची बैठक जिल्हाध्यक्ष *विनायकराव दसरे* यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.होटेल संध्या एक्झिक्युटिव्ह सिडको नांदेड येथे बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष *देविदास बस्वदे, केंद्रप्रमुख संघटने चे राज्य उपाध्यक्ष बालाजी डफडे व सहकारी शिक्षण पतपेढी नांदेड चे मा व्हा चेअरमन तथा संचालक विजय पल्लेवाड* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या
या बैठकीत केंद्रप्रमुख यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष बालाजी डफडे यांनी आपल्यावर अशैक्षणिक कामाचा ताण प्रशासनाकडून होत असल्याने गुणवत्ता वाढीवर परिणाम होत असल्याचे म्हणाले. केंद्रप्रमुख संघटनेचे राज्यात संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाषणातुन सांगितले.
जिल्हाध्यक्ष *विनायक दासरे तसेच माधव लोलमवाड* यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत उपस्थित सभासदां पूढे भूमिका मांडली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नेहमी केंद्रप्रमुख यांच्या समस्यांच्या बाबतीत सोबत राहिलेला आहे यापुढेही केंद्रप्रमुखांच्या सर्व समस्यांच्या बाबतीत आम्ही प्राधान्यक्रम देऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र राज्य *केंद्रप्रमुख संघटेनस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ* हातात हात करून एकत्रित रित्या यापुढे समन्वयाने काम करतील असा निर्धार या बैठकीत उपस्थित केंद्रप्रमुख यांनी व्यक्त केला.याच बैठकीत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वाय. टी. कदम, डी.एम.नामेवार, एल एस. पठाण बालाजी कोंडावार,यांना निरोप देण्यात आला.,
प्रल्हाद कदम,माधव लोलमवार, निरंजन भारती,मदन नायके, सौ.एस. पांडे. सौ.एस.ए. भद्रे; के.व्ही. पाठक, सौ. पांडे ए आर; किसवे आर. पी; होळकर पी जी भेदेकर बी जे. मुदखेड ए. आर; दूधमल एम. एन; यांचेसह जिल्हयातील कार्यकर्ते सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.संचलन बाळासाहेब कदम यांनी तर किसवे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.