खैरीयत चाहते हो..तो बताओ इसमें से अप्पासाहेब नाईक कोण है !” ———————————————– कल्हाळी येथील नाईकांच्या बचावासाठी 36 जनानी हुतात्मे पत्कारले.


36 हुतात्म्यांच्या स्मृती नामशेष होण्याच्या मार्गावर ;बोलबचन नेत्यांच्या केवळ एका दिवसापुरत्याच पोकळ घोषणा …..घोषणाच…!

—————————————————— 

     कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावातील रझाकारांचा इतिहास  अंगावर शहारे व थरकाप  आणणारा आहे. सतत तिन दिवस रझाकारानी थयथयाट माजवला होता.आप्पासाहेबा हे आक्रमक असल्याने रझाकारांना जास्तीचे महत्व देत नव्हते. अहमदमियाँ नावाचा रझाकार यांच्या सोबत आप्पासाहेबांचा जुनाच वाद होता.या दोघांनीही एकमेकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

त्यातच अहमदमियाँ हा कंधारचा रझाकाराचा प्रमुख झाला आणि कल्हाळी येथील लोकांचा सुड घेण्यास सुरावत केली.29जुलै 1948 रोजी हा दिवस कल्हाळीकरांना काळा दिवस ठरला होत्याचे नव्हते झाले.रझाकारांनी प्रंचड गोळीबार केला,आया बहीनीवर आत्याचार केला.

“खैरियत चाहते हो.तो बाताव ईसमें से आप्पासाहेब नाईक कोण है.. अप्पासाहेबांच्या बचावासाठी 35 जनांनी मै अप्पासाब हु.! अशा एकच आवाज आला.हे एकताच रझाकारांनी धडधड गोळीबार केला .

एकाच वेळी 35 जन हुतात्मे झाले.हा इतिहास कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावच्या मातीचा आहे.परंतु राजकीय नेत्यांच्या नाकार्तेपणा मुळे या मातीचा इतिहास पुसला जात आहे.35 हुतात्म्यांच्या स्मृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.17संप्टेबंर हा दिवस आला की,अनेक राजकीय नेत्यांना खरबडुन जाग येतो. ते कल्हाळी येथे जावून  श्रध्दाजंली वाहण्याचा कार्यक्रम करुन मोठमोठ्या  पोकळ गप्पा  मारुन मोकळे होताना दिसत आहे.


  कल्हाळीचा रणसंग्राम हा मराठवाडा स्वांतञ्य संग्रामाचा एक भाग होता.कंधार तालुक्यातील कल्हाळी हे लहानसे खेडगाव आहे.सातारा जिल्ह्यातील वावटा काशदा या गावच्या बापुसाहेब भगवंतराव  नाईक व आप्पासाहेब नाईक यांची जहांगीर होती.  अप्पासाहेब व अहमदमियाँ यांच्यात पहीलेच वैर असताना  अहमदमियाँ हा कंधारचा रझाकार प्रमुख झाला .आणि अप्पासाहेबांनवर  मुदखेडचा  पोलीस अधिकारी  अहमदखान यांनी अहममियाँ यांच्या सांगण्यावरुन  आप्पासाहेबावर डाका घातल्याचे सात गुन्हे नोंदविले.

यावेळी हैद्राबादच्या नवाबचे पुत्र रशिदखान हे नांदेड जिल्हाचे पोलिस अधिकारी होते. पुढे रशिदखानला वरंगळला पाठवले आणि नांदेडला जैदी हे पोलिस अधिकारी म्हणुन आले. त्यांनी तर अनेकांना रझाकार बन नही तो मार दुगाँ  म्हणून लोकांनवर अन्याय, आत्याचारा सारखे प्रकार चालु केले. यातुन मोठ्याप्रमाणात जनतेत चिड निर्माण होत गेली. 

 7 व 15 ऑगस्ट 1947 रोजी आप्पासाहेबांनी कल्हाळीत ध्वजारोहन केले व आपल्या गढीवर तिरंगा लावला. त्यामुळे मुखेडचा फौजदार अहमदखान”याने कल्हाळीवर हल्ला गोळीबार केला. परंतु आप्पासाहेबांनी त्याला गोळीबाराने प्रत्युत्तर देऊन पळवुन लावले. यानंतर आप्पसाहेबांनी निझामाच्या पोलिस व रझाकाराशी  लढा देण्याचे ठरविले .

त्यासाठी त्यांना शस्त्रास्त्राची गरज निर्माण झाली हे शस्ञसाठा कोठुन आणायचा आशा प्रश्न त्यांना पडला.लगेच त्यांनी एक युक्ती केली हा लढा तिव्र करुन रझाकांनसोबात लढायचे आसेल तर  कुंटुर नायगाव, मुखेड,कंधार,सोनखेड व नांदेड पोलीस ठाण्यावर हल्ला करुन शस्ञ जमा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी हालचालही सुरु केली.

  या हलचाली चालु आसतानाच मध्ये सरकारने शेतसारा व लेव्ही वसुलीचा धडाका सुरु केला होता. या वसुलीच्या नावाखाली येथील जनतेवर आत्याचार करण्याचा रझाकारांचा  हेतू होता. गंगाधर पटवारी हा शासकिय नोकर होता तो कायद्याचा धाक दरारा दाखवुन जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली . त्यामुळे आप्पासाहेबांनी गंगाधर पटवारी यास आपल्या गढीत बोलावुन धमकी दिला.यावरुन पटवारी यांनी  तेथील तहसिलदाराला आप्पासाहेबांनी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तिखट मिठ लावुन सांगितली. तेव्हा संतप्त झालेल्या तहसिलदाराने काही कर्मचारी व अमिनसाहेब यांना सोबत देऊन वसुलीसाठी कल्हाळीला पाठवले .

यावर्षी नापिकी झाल्यामुळे वसुली देणार नाही असे आप्पसाहेबांनी ठणकावुन सांगताच वाद निर्माण झाला.आप्पासाहेबांनी अमिनसाहेबांच्या मांडित गोळी मारली.यामुळे हे जास्तीचे  प्रकरण वाढले.अमिनसाहेब कल्हाळीचा सुड उगविण्यासाठी कंधारच्या दोनशे रझाकारांच्या टोळीसह गंगाधर पटवारी सोबत कल्हाळीला गेला .

त्याने वसुली न देणाऱ्या  लोकांची घरे रझाकारांना दाखवली यावरुन रझाकारांनी गावातील लोकांची जाळुन टाकली. अनेक पुरुषांना मारहाण केली,तर स्त्रियांची बेअब्रु केली. यावेळी आप्पासाहेब कंधारला होते. रझाकारांच्या हल्ल्याची बातमी समजताच ते  कल्हाळीला आले . तोपर्यंत रझाकार पळुन गेले होते . यानंतर चार दिवसांनी आप्पासाहेबांच्या माणसांनी गंगाधर पटवारी यास पेठवडजच्या बाजारात दिवसा गोळी घालून ठार केले.       

 अमिनसाहेबांनी यापुर्वीच आप्पासाहेब नाईकांचा बदला घेण्यासाठी सशस्त्र पोलिस मदतीला देण्याची कंधार व नांदेडला मागणी  केली . त्यानुसार सरकारने नाईकांचा बदला घेण्यासाठी 750 सशस्त्र पोलीसांची एक तुकडी 29 जुलै 1948 रोजी कल्हाळीला पाठवली. पोलिसासोबत 2500 रझाकार होते. पोलीस कल्हाळीत शिरताच आप्पासाहेबांनी गावातील सर्व बायका ,पोरांना व जनावरांनाही आपल्या गढीत घेऊन दरवाजा बंद केला .

आप्पासाहेब नाईक ,संभाजी टोळ ,लक्ष्मणराव वडजे ,तुकाराम वारीक व धोंडोबा पंदाडे यांच्याप्रमाणेच गावातील ल सर्व स्ञी -पुरुषांनी पोलीसांवर गोळीबार केला यात  25 रझाकारांना त्यांनी ठार केले. पण दुसऱ्या    दिवशी पुन्हा  पोलिस दल कल्हाळीत घुसले आणि त्यांनी गढीवर मारा सुरु केला. नाईकांनी केलेल्या प्रतिकारात 25 पोलिस ठार झाले. परंतु गढीतील शस्त्रसाठा,दारुगोळा,व अन्नधान्य संपल्यामुळे नाईक हतबल झाले .

त्यांनी गढीच्या दाराच्या वरच्या बाजुस आवाज करुन गोंधळ माजवुन पोलिसांचे लक्ष तिकडे वळविले व मागच्या बाजुने नाहानीच्या नालीचे तोंड मोठे करुन त्यामधुन गढीतील बायका पोर व नंतर पुरुषांना बाहेर काढले  व यानंतर त्यांनी गढीचा दरवाजा उघडला व बाहेर पडले . 

पण यापुर्वीच  पोलीसांनी तिस लोकांना  पकडले होते. त्यांना खैरीयत चाहते हो तो बताव ,इसमेंसे  आप्पासाहेब कोन है..?अशी विचारणा केली असता त्यातील सर्वांनी मै आप्पासाहेब  हुँ..असे सांगीतले. त्यामुळे संतापलेल्या पोलीसांनी त्या सर्वांना एका रांगेत उभे करुन गोळ्या घालुन ठार केले. ईकडे आप्पासाहेब ,तुकाराम वारीक,संभाजी टोळ ,धोंडिबा पंदाडे व किसन यांनी समोरच्या गोविंद कल्हाळे यांच्या घरात आश्रय घेतला .या यापैकी पंदाडे घराबाहेर उभा असता त्यास पोलीसांनी पकडले व आप्पासाहेबाचा पत्ता विचारला .

त्याने आपणच आप्पासाहेब असल्याचे सांगीतले .त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी त्याचे दोन्ही हात कापले व डोळ्यात तलवारीचे टोक खुपसले .यापुर्वीच त्यांनी आप्पासाहेब असलेल्या दाराकडे बोट दाखवले . त्यामुळे पोलिसांनी आप्पासाहेबांवर स्टेनगनचा मारा सुरु केला . आप्पासाहेबांनी पोलीसांशी सशस्त्र लढा दिला परंतु ते त्यांच्या साथीदारासह ठार झाले .या कल्हाळीचा रणासंग्रामात 35 लोकांना ठार करण्यात आले .

गढीतील दरवाजे ,लाकडे व इतर सामानाची मोडतोड करुण तयार केलेल्या लाकडावरच या 35 लोकांना ठेवण्यात आले. यानंतर रझाकार व पोलीसांनी संपुर्ण गढीलाच आग लावली . 29,30 व 31 जुलै 1948 (शुक्रवार, शनिवार ,रविवार) असे  तिन दिवस नाईक व त्यांच्या सहकार्यांची पोलीस व रझाकारांशी कडवी झुंज दिली. पण त्यामध्येच त्यांना विरमरण प्राप्त झाले. कल्हाळी हे गाव तिन दिवस जळत होते.

हा इतिहास या रणभुमीचा आहे.35 शुरविराना अग्नी देण्यात आलेल्या पविञ स्थळी या शूरवीरांच्या स्मृती चक्क नामशेष झाल्या आसून कसल्याच प्रकारच्या खुणा किंव्हा चिरा देखील आठवण म्हणून मातीचा ढिगते तेवढा शिल्लक आहे.


        या पविञ स्थळी घडलेल्या रक्तरंजीत इतिहासाला प्राथमिक स्तरावर अभ्यासात स्थान मिळवुन विद्यार्थ्यांना  धडे द्यावे तरच ही शहारे व थरकाप करणारी घटना चिरकाळ टिकून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.याच भुमीवर हुतात्म्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी  एखादे स्मारक असावे,या गावचा विकास करुन प्रटन स्थळ बणवावे अशी तमाम जनतेची व अभ्यासकाची मागणी आहे

परंतु राजकीय नेते या इतिहासाला जास्तीचे महत्व देत नाहीत.17 संप्टेबंर आला कि या नेत्यांना जाग येतो.कल्हाळी येथे जावुन हे महाशय श्राध्दाजंली वाहण्याचे नाटक करुन स्मारक बांधण्याच्या व विकासाच्या गप्पा मारुन मोकळे होतात ,ही परंमपरा गेल्या अनेक वर्षापासुन चालत आली आहे.या शुरवीर हुतात्म्यांना भावपुर्ण अभिवादन ..

माधव भालेराव,

संपादक, हिंदवीबाणा लाईव्ह

युगसाक्षी संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *