****
आपले राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रज्जासत्ताक दिन.भारतीय ईतिहासात या दोन सणाला जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व मराठवाड्यातील जनतेसाठी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस (17 सप्टेंबर 1948) या दिवसाला आहे.
कारण हा दिवस तमाम मराठवाड्यातील जनतेसाठी सोनेरे दिवस आहे आहे असे मनायला हरकत नाही..कारण याच दिवशी एक कोटी विस लाख जनता निजामाच्या जुल्मातुन मुक्त झाली..
17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला, तेलंगना ,उत्तर कर्नाटक व विदर्भ हे भाग हैद्राबाद संस्थानात सन 1724 पासुन होते.परंतु हैद्राबाद चा निजाम स्वतःला अमिरो मोमीन (तमाम मुस्लीमांचा अमीर)समजनारा मीर उस्मान अली याला हे मान्य नव्हते ..
.सर्व प्रजा आपली गुलाम बणून राहावी.आपणच यांचे बादेशहा व्हावे असे याला वाटे.परंतु मराडवाड्याचे भाग्यविधाते स्वामी रामानंद तिर्थ यांना आपला मराठवाडा मुक्त झाला पाहिजे असे वाटे.
कारण निजामाची गुलामगीरी मराठवाड्यातील जनतेला अन्यायकारक वाटे,,बघता बघता स्वामींच्या नेतृत्वाखाली मुक्तीचा वनवा पेटला.
सर्व नेत्यांना वाटे आपण स्वतंत्र झालो की ,आपला विकास होईल यात गोविंदभाई श्राफ ,गोविंदराव पानसरे,भाई शामल ,नवसाजी नाईक,श्रीधर वर्तक,बह्रजी शिंदे ,शोएबअल्ली खां,हुतात्मा जयवंतराव पाटील.
या स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढाईत सहभागी होऊन हा लढा यशस्वी करुन दाखवला,,
1948 मध्ये तत्कालीन केंद्रीय ग्रहमंञी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्य काळात मराठवाडा हैद्राबाद संस्थानामधुन वेगळा झाला.सामाजिक स्थिती ,,,,
,———————-
निजामकालिन सामाजिक ,धार्मिक ,राजकीय स्थिती अतिशय भयानक होती,,,राजा बोले दल हले या उक्ती प्रमाणे वागावे लागे,,स्ञीयांना सामाजिक ,धार्मिक कार्य क्रमात अजिबात स्थान नव्हते .परंतु मराठवाडामुक्तीदिनापासुन आज पर्यत आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत.पण
ख-या अर्थाने आपण मुक्त झालो का? त्या काळापासून आज या काळापर्यत विकासाची गंगा महाराष्ट्रातील मराठवाड्यात आली का?याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल.
मराठवाडा मुक्त झाला तर मराठवाड्याचा विकास होईल असे नेत्यांना वाटे.त्या काळात हैद्राबाद संस्थानात बहुसंख्य असलेल्या हिंदुवर अत्याचार होत होते.
आर्य समाज व हिंदु महासभा या दोन सामाजिक संघटनांनी हे अत्याचार हाणुन पाडण्याचा प्रयत्न केला.1937 च्या फेब्रुवारीत गुंजोटीच्या दासप्पा शिवदास हर्के या तरुणाने रझाकारांना विरोध करत आपले प्राण आर्पन केले.
रजाकारचा पुढारी कासिम रिजवी हा मोठा जुल्मी होता,,समाजावर अन्याय करणे हा त्याचा धर्मच होता..
16 मार्च 1948 रोजी हदगाव तालुक्यातील कोळी या गावी साहेबराव बारडकरांच्या नेतृत्वाखाली रझाकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यात तुफान झडप झाली .उदेश हाच की मराठवाड्यातील जनतेला माणुस म्हणून जगता आले पाहिजे .
राजकीय संघर्ष …..कोणतेही आंदोलन यशस्वी करण्यासाठी साम,दाम लागतो ,म्हणून आंदोलन यशस्वी करण्यासाठी पैशाची गरज भासु लागली . तेव्हा आंदोलकांनी विचार केला की आपल्याला पैशाची गरज आहे आणि निजामाला तर नामोहरण करायचे ,
तेव्हा निजामाची सरकारी ब्यांक लुटली तर निजामाला अद्दल घडेल म्हणून 30 जानेवारी 1948 रोजी उमरी येथील ब्यांक आंदोलन कर्त्यांनी लुटुन जवळजवळ विस लाख सत्तर हजार रुपये लुटुन त्यातुन शस्ञास्ञ खरेदी करुन आंदोलन यशस्वी केले,
या आंदोलनाला सर्व समाजातील व्यक्ती .विद्यार्थी सहभागी झाले होते.त्याच प्रमाणे 1938मध्ये औरंगाबाद च्या शासकीय महाविद्यालयात गोविंदभाई श्राफ यांच्या नेतृत्वाखाली 1200 ते 1300 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत म्हणण्याचा आग्रह धरला व झेंडा सत्याग्रह केला.
.हैद्राबाद किल्यावरचा असफजाही वंशाच्या धर्मांध सत्तेचे प्रतीक असणारा पिवळा ध्वज खाली उतरवून स्वतंत्र भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकू लागला..
सद्यस्थिती…..
आज आपण मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतो.पण खरोखरच मराठवाड्यातील जनता मुक्त झाली का? मराठवाड्याचा विकास झाला का? विकासाच्या बाबतीत ईतर विभागाच्या तुलनेत मराठवाडा फारच मागे आहे.
याला कारण राजकीय अनास्था आहे.एकदा का आमदार ,खासदार निवडून आले की पुढच्या पाचच वर्षी तोंड दाखवतात, रस्ते ,पिण्याचे पाणी आणि शिक्षणक्षेञात आजही आपण मागे आहोत.
मराठवाड्यातील ईतर जिल्ह्याच्या तीलनेत बीड जिल्हा फारच मागे आहे. उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
सिंचन आणि शिक्षण कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही,पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पुरेशी शेती पीकत नाही त्यामुळे आत्महत्या चे प्रमाण आहे.
जिल्ह्यात म्हणावे तसे उद्योग धंदे नाहीत.नांदेड जिल्ह्यात आजही आदिवासी भाग आहे.एकविसाव्या शतकाकडे जात असताना प्रत्येकालाच आपण मागास आहोत असे वाटत आहे. आमदार ,खासदारांना तहहयात पेन्शन आहे,
शिकल्या सवरल्या नविन गुरुजींना पेंन्शन नाही हीच शोकांतीका आहे.पाच सहा वर्षापासुन नोकरभरती नाही .मग वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी वाढणार नाही हे कशावरुन?
विकासाची दुरदृष्टी समोर ठेऊन अंतर्गत हेवेदावे बाजुला सारुन विकासासाठी राजकारणी एकञ आले तरच आपल्या मराठवाड्याचा विकास होईल.
अन्यथा आवो भाई बांधो भारा.आधा तुम्हारा आधा मेरा असे जर होत राहिले तर त्या स्वातंत्र्य सैनिकांना काय वाटत असेल.
केवळ स्मृतीस्तंभावर जाऊन आदरांजली वाहिली की झाले असे न होतात्यांच्या प्राणाची आहुती आठवण करुन विधायक कामे करण्याचा संकल्प करुया..
.,प्रा.शेख युसूफ मौलासाब आंबुलगेकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
नवरंगपूरा /कंधार