अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सुधाकरराव कांबळे तर सरचिटणीस पदी रामभाऊ देवकांबळे यांची निवड

 

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सुरेशराव हाटकर व लोहा कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर यांनी कॉग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष पदी सुधाकरराव कांबळे तर सरचिटणीस पदी रामभाऊ देवकांबळे यांची निवड करण्यात आली .

 

माजी आपदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी कंधार येथे दि . १८ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सुधाकरराव कांबळे, नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी उत्तमराव महाबळे, जिल्हा सरचिटणीस पदी रामभाऊ देवकांबळे, जिल्हा सरचिटणीसपदी किरण कोकाटे, जिल्हा सरचिटणीस पदी मोहन कांबळे यांची निवड केली आहे .

या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी लोहा कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, माजी उपनगराध्यक्ष मन्नान भाई चौधरी सरपंच बालाप्रसाद पाटील मानसपुरे, माजी सरपंच नन्हु पटेल, जयराम पाटील मोरे, प्रविण महाबळे आदींसह कॉग्रेस कार्यकर्ते. उपस्थित होते .

 

(छाया – विनोद महाबळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *