धनंजय माने इथेच रहातात का ??.. अगदी सेम तशीच्या तशी ती टकटक होती.. कधी नव्हे तो दुपारी १२ वाजता डोळा लागला .. अगदी १० मिनीटासाठी मी समाधीस्त झाले होते.. रात्री कायमच शांत झोपणारी मी आणि कधीही दिवसा अजिबात अंग न टेकवणारी मी आज निद्रादेवीने जणू वेगळा अवतार घेतला होता …
आतूनच गेटच्या बाहेर पाहिलं तर कोणीही दिसलं नाही म्हणुन जोरात आवाज दिला , कोण आहे ??.. एक आजी आजोबा पेहरावरुन गावाकडचे वाटत होते.. मोठं कुंकू , हातात हिरव्या बांगड्या , आणि नउवारी साडी आणि आजोबा धोतर बंडी .. आजीच्या डोक्यावर टोपलीत देवी होती.. मला म्हणाल्या , लेकरा देवीसाठी काहीतरी दे , तिला भुक लागली असल.. उन्ह लय हाय आणि मला पानी दे.. मी आत गेले आणि तांब्याभर पाणी आणून दिलं आणि म्हटलं , आजी भाकरी खाणार का ??. हे विचारताना तिचं ते वाक्य ( देवीला भुक लागली असल ) कानात अखंड घुमत असल्याचा भास होत होता.. आज्जी फार शिकलेली नसणार पण देवालाही भुक लागते हे ती सांगून गेली.. मी रोज कृष्णाला जेवायला देउन मग जेवते त्यामागील कारणे कदाचित तिला माहीत नव्हती पण त्याचं अस्तित्व तिला नाकारायचं नव्हतं..मी म्हटलं , भरलं वांगं आणि भरलं कारलं केलय आणि गाजराची कोशींबीर फक्त भाकरी करायची आहे .. तुम्ही बसाल का ??.. फक्त ५/७ मीनीटे लागतील .. त्यावर त्या म्हणाल्या , नको लेकरा आमच्याकडे भाकर हाय.. पण देवी भुकेलेय तिला तेवढं दे.. मला काहीही कळेना.. मी म्हटलं , पैसे हवे आहेत का ??.. न्हाय न्हाय पैसं नकोत .. मग मी म्हटलं , काही धान्य देउ का ??. नको पोरी फकस्त ओटी भर तिची.. मी आत गेले..
ओटी घेउन बाहेर आले .. ओटी तिच्या टोपलीत ठेवली नमस्कार केला आणि पाण्याचा तांब्या घेउन आत गेले आणि आत जाताना त्यांना म्हटलं, जेवणाच्या वेळी उपाशी जाऊ नको.. थांबा मी थोडं काहीतरी देते.. तुम्ही भुक लागली की खा. असं म्हणुन मी आत गेले.. डबा उघडला त्यात चिवड्याचं पाकीट होतं ते घेतलं आणि बाहेर गेले तर आज्जी आजोबा गायब.. फक्त एक मिनीटात हे कुठे गेले म्हणुन बाहेर रोडवर गेले.. इकडे तिकडे पाहिले आसपास कोणीही नाही.. त्या उन्हात तशीच ५ मीनीटे उभी राहिले तरीही आज्जी दिसेना.. हा काय चमत्कार ??. काहीही कळलं नाही.. फक्त ओटीसाठी ती आज्जी आली होती की देवी आली होती ??.. मी नवरात्रात किवा कधीही देवीला ओटी देत नाही.. आमच्या सोसायटीत झाडणाऱ्या मावशीला नवरात्रात साडी देते ती तर देउन झाली होती.. मग मला एकदम आठवलं , आमच्या गावाला देवी येते आणि माझी आई माझ्या नावाने तिची ओटी भरते .. तिला फोन करुन म्हटलं , अगं यावर्षी देवीला तु ओटी दिली नाहीस का ??.. ती म्हणाली , अगं त्याचवेळी मी ॲडमीट होते ना.. पायाचं ऑपरेशन नाही का झालं.. मी फक्त तिला ओहनोह असं बोलले आणि म्हटलं , अगं आज ती स्वतः येउन ओटी घेउन गेली वाटतं… तिलाही काही कळेना.. मग तिला घडलेला प्रसंग सांगितला.. ते ऐकून आई म्हणाली , अगं आपलं चुकलच बहुतेक कारण गेल्या ४७ वर्षात मी एकदाही ओटी चुकवली नाही आणि तुझं लग्न झाल्यापासून २५ वर्षात मी तुझीही ओटी भरत होते.. आईला म्हटलं, आपण मुद्दाम केलं नाही म्हणुन ती स्वतः येउन घेउन गेली असेल… आणि फोन ठेउन दिला.. घरात गेले आणि दोन भाकऱ्या केल्या ..
कृष्णाला जेवायला दिलं आणि सचिनला देउन मी जेवायला घेतलं पण ते ठसठशीत कुंकु , हिरव्या बांगड्या , आणि टोपलीत असलेली देवी माझ्या नजरेसमोरुन जाईना.. दारावर पडलेली थाप ही कधी कोणाची असेल सांगता येत नाही.. आणि कोण कोणाच्या रुपात येउन आपला वाटा घेउन जाईल हेही कळणार नाही.. फक्त आपल्याला योग्य ठिकाणी देता यायला हवं त्यासाठी आपली सदसदविवेक बुध्दी जागृत असायला हवी.. माणसाचही तेच , आपण उधारी घेतो आणि परत करत नाही पण तो कधी वसुल करुन जाईल आपल्या लक्षातही येत नाही.. ( एक सुंदर ताजा अनुभव शेअर करावा वाटला )
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist