नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी सौ. राजश्री भिष्माचार्य शिंदे नळगे यांची निवड

 

कंधार ; प्रतिनिधी

 

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या प्रभारी डॉ. रेखाताई चव्हाण यांनी नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी सौ. राजश्री भिष्माचार्य शिंदे नळगे, जिल्हा महिला कॉग्रेसच्या सरचिटणीस पदी सौ. कल्पना चंद्रकांत पाटील पेठकर यांची निवड केली आहे निवडी बद्दल त्यांचा सत्कार करुन नियुक्तीचे पत्र देताना, सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई भोसीकर यावेळी बहाद्दरपुरा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुमनबाई खराव व मोठ्या संख्येने महिला कॉग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

छाया – विनोद महाबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *