करकाळा उमरी येथील श्री यशवंतराव चव्हाण
ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
विसाव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी
प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार
प्रा महेश मोरे यांची एक मताने निवड झाली आहे
वर्ष 2025 च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भोकर येथील श्री शाहू महाराज हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हे संमेलन नियोजित आहे
संवेदना निवासस्थानी ऍड एल जी पुयड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सल्लागार समितीने सदरील निर्णय घेतला.
यावेळी देविदास फुलारी, निर्मल कुमार सूर्यवंशी, प्रा.नारायण शिंदे,
इंजिनीयर मिलिंद गायकवाड ,बापूराव पाटील आणि भगवान पाटील करकाळेकर यांची उपस्थिती होती .
*** प्रा. महेश मोरे यांची ग्रंथसंपदा :****
शिवार १९९७(कवितासंग्रह ),हिरवे रान २०००(कवितासंग्रह ), पाऊस काळ २००४ (कवितासंग्रह ), शेतकऱ्याचे आसूड (काव्यरूप ) २००८ , गाव पांढरी (कादंबरी ) , स्वातंत्र्य सेनानी दिपाजी पाटील (चरित्र )२००९ , माळेगावची यात्रा (अनुवाद ) , गुराखी गड (बालकविता संग्रह ) २०१४ खंडोबा यात्रा ( किशोरी कादंबरी ) २०१५ , शहीद संभाजी कदम (चरित्र ) २०१८ , बोऱ्याची गाठ (कादंबरी ) २०२१
विविध राज्यस्तरीय पुरस्काराने प्रा. महेश मोरे सरांना सन्मानित करण्यात आले आहे.