#नांदेड दि. २८ :- परिवहन्नेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच २६-सीआर ही नवीन #मालिका २९ ऑक्टोंबर २०२४ पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २.३० पर्यत स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.