नांदेड, दि. २८ ऑक्टोंबर :- आस्था एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स , शामनगर नांदेड येथे #मतदान जनजागृतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
#नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीकरिता सबंध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्नशील आहेत . याचाच एक भाग म्हणून श्यामनगर येथील नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली . तसेच या परिसरात एक छोटीशी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली . मी तर मतदान करणारच पण माझ्यासह माझ्या परिवारातील व नातलगातील तसेच आसपासच्या परिसरातील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करून राष्ट्रीय कर्तव्य बजावणार, अशी ही शपथ घेण्यात आली.
या प्रसंगी डॉ. अभयकुमार दांडगे, प्राचार्या श्रीमती नीता बेद्रे , शुभांगी शिंदे , कोमल बैलवाड, सौ लामतुरे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
०००००
#विधानसभानिवडणूक२०२४