अशी ही बनवाबनवी..

सिनेमा आणि त्यातील प्रत्येक डायलॉग कोणाला माहित नाही असा एकही माणूस सापडणार नाही.. जितक्या वेळा हा सिनेमा मी पहाते तितक्या वेळा नव्याने त्याच्या प्रेमात पडते. काल झी युवा वर हा सिनेमा पहात होते आणि एका सिनसाठी कॅमेरा पुण्यावर फिरला .. मी बारकाईने पुण्याला पहात होते.. पुण्यात जन्मलेल्या अनेक लोकांकडून मी अनेकदा पूर्वीच्या पुण्याबद्द्ल ऐकलय.. पुणे थंड हवेचे ठिकाण होते.. तुरळक वस्ती.. मोजक्या गाड्या.. जुने वाडे आणि शांतता..

सिनेमातील तो सीन पहात असताना एकदम आठवलं ते आजचं पुणं आणि रस्त्याच्या कडेला लावलेले भरमसाठ फटाक्यांचे स्टॉल.. आमच्याच सणाना विरोध का असं म्हणत अजून त्यात भर घालणारे महाभागही पुण्यातच आहेत… विरोध आपल्या सणाना नसून बिघडतेल्या परिस्थितीला आहे आणि याला जबाबदार आपणच आहोत.. काल सकाळी वृध्दाश्रमात जाताना सोसायटीमधे एक गृहस्थ भेटले. मी त्यांना वैयक्तिक ओळखते .. त्यांना टुव्हीलरवर पाहून मी म्हटलं , आज चक्क टु व्हीलरवर ??त्यावर ते म्हणाले , अगं चार टुव्हीलर आहेत त्यामुळे कधीतरी त्याही वापरतो.. हे ते इतक्या फुशारकीने सांगत होते की त्यांची किव करावी वाटली.. घरात माणसे ३ आणि गाड्या ५ .. खरच याची गरज आहे का ? तसच फटाक्यांच्या बाबतीत खरच सण साजरे करायला याची गरज आहे का ?? त्यापेक्षा मित्र परिवार , नातेवाईक यांना घरी बोलावून छान खाऊपिउ घाला.. बाहेर सणाच्या दिवशी अनेक मंडळी उपाशी असतात त्यांना खायला द्या.. फटाक्यांच्या आवाजाने प्राण्याना त्रास होतो.. प्रदूषण आहेच.. निवडणूका जवळ आल्याने राजकारण्यांची ही बनवाबनवी आहे.. वाट्टेल त्या गोष्टीना परवानगी देउन त्यांच्या जोडीला आपणही पापात सहभागी होतो.. सत्ता , पैसा यांच्या जोरावर चालत असलेल्या गोष्टीला आपणही खतपाणी घालतो आणि काही विपरित घडलं तर दोष सरकारला देतो..
आपल्या प्रत्येक सणामागचा उद्देश वेगळा आहे आणि आपण वेगळे वागतो. आज वसुबारस म्हणजे गाईची पुजा.. त्याचं महत्व आपल्या मुलांना समजावून सांगुन दिवाळीची उत्तम सुरुवात करता येउ शकते..मग यात फटाके कुठून येतात ??..तोच प्रश्न दारु सिगरेटच्या बाबतीत येतो.. पार्टी म्हणजे भेटी , गप्पा आणि खाणं मग यात दारु चा काय संबंध ?? मुली ज्या स्टाईलने सिगरेट ओढतात ना ते पाहून वाटतं , त्या काहीतरी जगावेगळे करत आहेत.. भगवंताने दिलेल्या सुंदर शरीराची आणि निसर्गाची त्या वाट लावत आहेत.. या आई झाल्यावर मुलांना काय संस्कार देणार ??
आम्ही २६ वर्षांपूर्वी पुण्यात आलो तेव्हाचं पुणं आणि त्यातील माणसं आणि आताचं पुणं आणि तिथे रहाणारी माणसे यात इतका फरक झालाय कि १० वर्षाने काय होइल याची कल्पनाही करवत नाही.. सगळीच बनवाबनवी सुरु आहे. निदान आपण आपल्यापुरतं तरी काही गोष्टी पाळूयात म्हणजे आपली पुढची पिढी निरोगी राहिल.. नाहीतर कृष्ण आहेच तो बरोबर सगळ्याना सरळ करेल.. निसर्गाशी जो बनवाबनवी करेल त्याला शिक्षा झाल्याशिवाय रहाणार नाही हे सत्य आहे..
दिवाळीच्या सगळ्याना निरोगी शुभेच्छा..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *