भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तरच्या वतीने दरवर्षी प्रकाश पर्व नावाचा विविध अंगाने परिपूर्ण असलेला कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या वर्षी प्रकाश पर्व 2 चे आयोजन करण्यात आले होते. यात काव्य, गायन, भाषण, प्रवचन आणि ग्रंथ प्रकाशन इत्यादी कार्यक्रम होते.
प्रकाश पर्व 2 चे उदघाट्क म्हणून चैत्य भूमी मुंबई चे पूज्य. भदंत बी. संघपाल महाथेरो यांनी धम्म पदातील मूल्य शिकवन यावर धम्म देसना दिली तर व्यख्याते म्हणून एड. विजयकुमार गोनारकर हे आमचे अर्थकारण या विषयाची मांडणी केली. गणपत गायकवाड यांनी लिहिलेल्या भावार्थ धम्म पद आणि रायगडावरून राजगृहाकडे या दोन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील अनेक मान्यवर तसेच उपासक, उपासिका उपस्थित होत्या उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भीम गीत गायक अनिलकुमार खोब्रागडे यांच्या सुगम गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले
प्रमुख उपस्थिता मध्ये संबोधी सोनकांबळे, डॉ. यशवंतराव चावरे, पी. एम. वाघमारे, अनिता खंदारे आणि रेखाताई पवार उपस्थित होत्या
गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एन सोनकांबळे यांनी केले, प्रास्ताविक डॉ. भीमराव वानंजे यांनी केले तर आभार कैलास पोहरे यांनी मानले…
प्रकाश पर्व 2 च्या यशस्वी आयोजनात ईश्वरराव जोंधळे, अंबादास कांबळे, नागराज कांबळे, मिलिंद जाधव, साहेबराव डोंगरे, बळीराम कसबे,बबनराव घोडगे शर्मिला थोरात, मुक्ता वैद्य, राहुल गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले