अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) चाकूर येथील जगत जागृती महाविद्यालयाचे प्रा उमाकांत शि चलवदे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने विद्यावाचस्पती ,पी एचडी ( डाॅक्टरेट ) प्रदान केली आहे. त्यामुळे त्यांचा येथील महात्मा बसवेश्वर चौकातील भागिरथी हाॅटेलमध्ये सत्कार करण्यात आला.
त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या साहित्यातून प्रतिबिंबीत होणारे शिक्षण विषयक विचार : एक चिकीत्सक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला आहे. त्यांना प्रा डॉ कदम व्ही के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, किलबिल चे संचालक ज्ञानोबा भोसले, मुखपृष्ठकार चंद्रशेखर भालेराव, प्रा डॉ अकबर लाला, शिक्षक पतपेढीचे संचालक संजय पवार, प्रा बालाजी आचार्य, प्रा अभिजित बचुटे, पत्रकार बालाजी पारेकर, श्लोक चलवदे आणि प्रा भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती. प्रा डॉ उमाकांत शि चलवदे हे चंद्रशेखर भालेराव आणि राजीव पीटलावार यांचे सहकारी मित्र होत.